भारत आता फुटबॉलचा देश

पीटीआय
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कोलकता - तुम्हा सर्व भारतीयांचे मनपूर्वक धन्यवाद. येथे येऊन मी धन्य झालो, हे शब्द आहेत जागतिक फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष गिआनी इन्फाटिनो यांचे. भारतात सुरू असलेल्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉलला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी भारत आता फुटबॉलचा देश झाला आहे, अशी शाबासकीची थाप मारली.

शनिवारी कोलकतात स्पेन आणि इंग्लंड यांच्यात विजेतेपदासाठी लढत आहे. त्यासाठी इन्फाटिनो आले आहेत. त्यांना या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या संयोजनाबाबत विचारले असता, त्यांनी सर्व भारतीयांचे धन्यवाद, येथे येऊन आम्ही धन्य झालो, असे मत व्यक्त केले.

प्रेक्षकांच्या उदंड पाठिंब्यामुळे फिफाही भारावले आहे. त्यामुळे २०१९ मधील २० वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळण्याची शक्‍यता वाढली आहे. सलग दोन स्पर्धांचे आयोजन एकाच देशाला फिफाकडून दिले जात नाही; पण उद्या होणाऱ्या फिफाच्या बैठकीत आपलाच नियम फिफा मोडण्याची शक्‍यता आहे, असे भारतीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: sports news football india