बोपण्णाचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद

पीटीआय
शुक्रवार, 9 जून 2017

पॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने बुधवारी कॅनडाची सहकारी गॅब्रिएला डॅब्रोवस्की हिच्या साथीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. बोपण्णाचे कारकिर्दीमधील पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून, तो ग्रॅंड स्लॅम जिंकणारा चौथा भारतीय ठरला. 

सातवे मानांकन असलेल्या बोपण्णा-डॅब्रोवस्की जोडीने अंतिम फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत दोन मॅच पॉइंट वाचवत ॲना लेना ग्रोएनफिल्ड (कॅनडा)-रॉबर्ट फराह (कोलंबिया) जोडीचा सुपर टायब्रेकमध्ये २-६, ६-२, १२-१० असा पराभव केला. 

बोपण्णा आणि डॅब्रोवस्की दोन गुणांनी पिछाडीवर होते; पण फराह आणि ग्रोएनफिल्ड यांना संधीचा फायदा उठवता आला नाही. दोन मॅच पॉइंट वाचवून बोपण्णा-डॅब्रोवस्की यांनी विजेतेपद निश्‍चित केले. ॲना हिच्याकडून सर्व्हिसवर ‘डबल फॉल्ट’ झाला आणि बोपण्णा-डॅब्रोवस्की जोडीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. 

बोपण्णा कारकिर्दीत दुसऱ्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचला होता. यापूर्वी २०१० मध्ये अमेरिकन स्पर्धेत पाकिस्तानच्या एसाम उल हक कुरेशीच्या साथीत बोपण्णाला पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अमेरिकेच्या माईक-बॉब ब्रायन बंधूंनी त्यांचा पराभव केला होता. यापूर्वी भारताकडून लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. 

पहिल्या सेटमध्ये डॅब्रोवस्की हिने निर्णायक क्षणी सर्व्हिस गमावली. फराहचा अचूक रिटर्न बोपण्णाच्या डोक्‍यावरून गेला. या वेळी ग्रोएनफिल्ड-फराह यांनी ३-१ अशी आघाडी मिळवून ती टिकवून ठेवत पहिला सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सुरवातीलाच बोपण्णाकडून ‘डबल फॉल्ट’ झाला; पण त्याने सर्व्हिस राखण्यात यश मिळविले. या वेळी एका ‘लाइन कॉल’वरून बोपण्णाने पंचांशी वाददेखील घातला; मात्र डॅब्रोवस्कीला आपली सर्व्हिस राखता आली नाही. अर्थात, या वेळी याचा फटका जास्त बसला नाही. बोपण्णा-डॅब्रोवस्की जोडीने ग्रोएनफिल्डची सर्व्हिस भेदत बरोबरी साधली. आपली सर्व्हिस राखल्यावर लगेचच बोपण्णा-डॅब्रोवस्की यांनी फराहची सर्व्हिस भेदत ४-२ अशी अशी आघाडी मिळवली. सातव्या गेमला डॅब्रोवस्की हिने लढतीत प्रथमच आपली सव्हिर्स राखली. त्यानंतर पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस भेदत बोपण्णा-डॅब्रोवस्की जोडीने सेटची बरोबरी साधली.

सुपर टायब्रेकमध्ये बोपण्णा-डॅब्रोवस्की यांनी ३-० अशी झकास सुरवात केली; पण सलग पाच गुण गमावल्याने त्यांना ३-५ असे पिछाडीवर राहावे लागले. त्यानंतर गुण फलक सातत्याने बरोबरीत होता. अखेरच्या टप्प्यात बोपण्णा-डॅब्रोवस्की यांनी संयम कायम राखत विजेतेपद निसटणार याची काळजी घेतली.

Web Title: sports news French Open tennis tournament Rohan Bopanna Anna-Lena Groenefeld