चौसष्ट घरांचा सम्राट पुन्हा दाखविणार कौशल्य

पीटीआय
शुक्रवार, 7 जुलै 2017

मॉस्को (रशिया) - निवृत्तीचा निर्णय मागे घेत पुन्हा एकदा खेळण्यासाठी चौसष्ट घरांचा अनभिषिक्त सम्राट ग्रॅंड मास्टर गॅरी कास्पारोव सज्ज झाला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अमेरिकन स्पर्धेत तो खेळणार असल्याचे संयोजकांनी गुरुवारी सांगितले. 

तब्बल १५ वर्षे चौसष्ट घरांच्या या खेळावर वर्चस्व राखल्यानंतर कास्पारोव पुन्हा एकदा आपले पटावरील कौशल्य दाखवणार आहे. सध्याच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन सह नऊ अव्वल खेळाडूंसमोर तो या स्पर्धेत आपले आव्हान ठेवणार आहे. कास्पारोवने खास आपल्या शैलीत ट्विट करून ही माहिती दिली. ‘चाली कशा करायच्या हे विसरलो तर नाही ना हे मला जाणून घ्यायचे आहे. या स्पर्धेनंतर मी निवृत्तीचा निर्णय मागे घेणार की नाही ते स्पष्ट करेन.’ असे त्याने ट्विट केले आहे. 

Web Title: sports news Grandmaster Garry Kasparov