दुखापतींचा विचार करणे सोडले - प्रणॉय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - दुखापती हा खेळाचाच भाग असतो. त्याचा जास्त विचार केला की जास्त त्रास होतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न करणेच माझ्या हाती आहे, तेच मी आता करीत आहे, असे अमेरिकन विजेत्या एच. एस. प्रणॉयने सांगितले.

प्रणॉयने इंडोनेशियन ओपन स्पर्धेत ली चाँग वेई आणि चेन लाँग यांना लागोपाठच्या लढतीत हरवले होते. त्यामुळे तो कॅनडा; तसेच अमेरिकन स्पर्धेत सहज बाजी मारेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात कॅनडा स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाल्यावर त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याची टीका सुरू झाली. त्या स्पर्धेच्या वेळी अचानक सूज आली आणि त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी झाली नाही.

अमेरिकन स्पर्धेपूर्वी अपेक्षेपेक्षा जास्त विश्रांती लाभली. आता अचानक दुखापतीही होणार. त्याचा त्रास कशाला करून घ्यायचा? त्यापेक्षा त्यातून चटकन कसे बरे होता येईल, याकडे लक्ष देतो, असे प्रणॉयने सांगितले.

कश्‍यपविरुद्धच्या अंतिम लढतीत निर्णायक गेममध्ये चांगली सुरवात झाल्यामुळे विजय सोपा झाला, असे त्याने सांगितले. आमच्या या लढतीतील प्रत्येक रॅली जवळपास पंधरा ते वीस शॉटस्‌ची झाली, असे त्याने सांगितले. विजेतेपदांचा दुष्काळ संपल्याचे त्याला समाधान होते. त्याच वेळी त्याने पराभव, अपयश हाही खेळाचाच भाग असल्याचे सांगितले. प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असतोच. प्रशिक्षणाचा उपयोग करण्याकडे लक्ष असते, कधी ते साध्य होते; तर कधी नाही, असे तो म्हणाला.

अमेरिकन स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे खूश आहे. या स्पर्धेतील कामगिरी चांगली झाली. प्रणॉयने जेत्यास साजेसा खेळ केला. प्रतिकूल परिस्थितीत मला अनेकांची साथ लाभली. त्यांचा मी खूप आभारी आहे.
- पारुपली कश्‍यप

Web Title: sports news h. s. prannoy talking