हीना सिद्धूला सुवर्णपदक, दीपकला ब्राँझ

पीटीआय
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

ब्रिस्बेन - भारताच्या नेमबाजांनी राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवसापासूनच आपला नेम दाखवायला सुरवात केली. हीना सिद्धूने महिलांच्या १० मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविले. पुरुष विभागात पात्रता फेरीत विक्रमी कामगिरी केल्यानंतरही गगन नानरंगला अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

गेल्याच आठवड्यात भारतात झालेल्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत हिनाने जितू रायच्या साथीत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळविले होते. तेच सातत्य हिनाने आजही कायम राखले. तिने अंतिम फेरीत २४०.८ गुणांची कमाई करताना ऑस्ट्रेलियाच्या एलिना गालियाबोविच (२३८.२) हिला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. तिचीच सहकारी क्रिस्टी गिलमन (२३७) तिसरी आली. 

पुरुष विभागात गगन नारंगने पात्रता फेरीत ६२६. २ गुणांची कमाई करून नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, त्याला अंतिम फेरीत लक्ष्य गवसले नाही. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताचाच रवीकुमार पाचावा आला. दीपक कुमारने ब्राँझपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत गगनची कामगिरी बघता त्याचे ‘लक्ष्य’ सुवर्ण स्पष्ट दिसून आले. प्रत्यक्षात अंतिम फेरीत तो अपयशी ठरला. त्याला एकदाही अचूक वेध घेता आला नाही. सहाव्या फौरीनंतर तो बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाच्या होबर्ग ॲलेक्‍सने सुवर्ण, तर त्याचाच संघ सहकारी जॅक रुस्टरला ब्राँझपदक मिळवले. भारताचा रवीकुमार २२४. २ कामगिरीसह सातव्या फेरीला बाहेर पडून ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

सातत्यपूर्ण हीना
गेल्याच महिन्यात जितू रायच्या साथीत विश्‍वकरंडक स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्ण
या प्रकारातील हिनाचे जितूच्या साथीत तिसरे  सुवर्ण
यापूर्वी दिल्ली आणि अझरबैझान येथे झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही मिश्र दुहेरीत सुवर्ण
मे महिन्यात चेक प्रजासत्ताक येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक

Web Title: sports news heena Commonwealth Shooting Championship