सलग तिसऱ्या विजयासह भारतीय महिला गटात अव्वल

पीटीआय
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

काकमिगहारा (जपान) - भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसऱ्या विजयासह आशिया करंडक हॉकी स्पर्धेत ‘ब’ गटातून अव्वल स्थान पटकावले. साखळीत मंगळवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा २-० असा पराभव केला. 

सिंगापूर, चीन संघावर विजय मिळवून सुरू केलेला धडाका भारतीय महिलांनी तिसऱ्या साम्नयातही कायम राखला. गटात अव्वल स्थान पटकावून उपांत्यपूर्व फेरी गाठताना त्यांनी आजही वर्चस्वपूर्ण खेळ केला. भारताकडून वंदना कटारिया, गुरजित कौर यांनी लागोपाठच्या मिनिटाला (अनुक्रमे ५४ आणि ५५) गोल केले.

सामन्याच्या सुरवातीच्या सत्रात दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेतला होता. मलेशिया अधिक बचावात्मक खेळत असताना भारताने संयम दाखवून नाहक चुका करणे टाळले. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीतच गेले. त्यातच मलेशियाने दुसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नर मिळवून भारताला पुन्हा नव्याने विचार करण्यास भाग पाडले. त्या वेळी भारताची गोलरक्षक रजनी एतिमाप्रू हिने मलेशियाचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर दोन्ही संघ सातत्याने पेनल्टी कॉर्नर मिळविण्याच्या प्रयत्नात राहिले. भारताने एक, मलेशियाने दोन कॉर्नर मिळविले. पण, दोन्ही कॉर्नर व्यर्थ ठरले. 

दुसऱ्या सत्राबरोबर विश्रांतीला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या तिसऱ्या सत्रात मलेशियाने आणखी एक कॉर्नर मिळविला. मात्र, तो देखील त्यांना साधण्यात अपयश आले. चौथ्या सत्रात मात्र, भारतीय खेळाडूंनी निराशेवर मात केली. लागोपाठच्या मिनिटाला त्यांनी गोल करून २-० अशी निर्णायक आघाडी मिळवली. प्रथम ५४व्या मिनिटाला वंदना कटारियाने मैदानी, तर पुढच्याच मिनिटाला गुरजितने कॉर्नरवर गोल केला. 

त्यानंतर मलेशियाच्या खेळाडूंनी अखेरच्या काही मिनिटात धडाकेबाज खेळ केला. मात्र, त्यांना भारतीय बचाव भेदता आला नाही.

Web Title: sports news hockey indian women