विश्‍वकरंडक हॉकीसाठी प्रसाद, शेख पंच

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नवी दिल्ली - पुढील वर्षी भारतात भुवनेश्‍वर येथे होणाऱ्या विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या रघू प्रसाद आणि जावेद शेख यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने बुधवारी या स्पर्धेसाठी २५ पंचांची निवड जाहीर केली. ही स्पर्धा पुढील वर्षी २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

या वर्षी पुरुष आणि महिला वर्ल्ड हॉकी लीग फायनल्स लीग स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिलेल्या जर्मनीच्या ख्रिस्तियन डेकेनब्रॉक यांची प्रमुख तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून निवडण्यात आलेल्या २५ पैकी सात पंचांना रिओ ऑलिंपिक स्पर्धेचा अनुभव आहे. अन्य नऊ जणांना प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे डेनॉन नेल हे व्हिडिओ पंचासाठी प्रशिक्षक असतील. आफ्रिकेच्याच सुहेब मंजरा यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

Web Title: sports news hockey World Cup Hockey