ईशाच्या विजयामुळे पदकाची आशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - ईशा करवडेच्या प्रभावी विजयामुळे भारतीय महिलांनी जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत व्हिएतनामचा पराभव केला; पण पुरुष संघाला रशियाविरुद्ध हार पत्करावी लागली. पुरुष संघ पोलंडबरोबर मॅचपॉइंटमध्ये मागे राहिल्याने पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. 

रशियातील या स्पर्धेत तिसऱ्या पटावर खेळताना ईशाने थि किम फुंग वो हिचा ८१ चालीपर्यंत लांबलेल्या लढतीत पराभव केला. द्रोणावली हरिका, तानिया सचदेव; तसेच पद्मिनी राऊतच्या लढती बरोबरीत सुटल्या. त्यामुळे भारतास २.५-१.५ या विजयावरच समाधान मानावे लागले. पाचव्या क्रमांकावरील भारतीय महिला संघाचे आता १७ गुण आहेत.

भारताच्या पदकाच्या आशा संपलेल्या नाहीत. या आशा कायम राखण्यासाठी भारतास अझरबैझानविरुद्ध किमान ३.५-०.५ असा विजय हवा आहे. 

पुरुषांच्या स्पर्धेत कडवी लढत दिल्यानंतरही भारतास रशियाविरुद्ध हार पत्करावी लागली. कृष्णन शशिकिरण, तसेच अधिबन भास्करन यांनी त्यांच्या लढती झटपट बरोबरीत सोडवल्या. विदीत गुजरातीने पीटर स्वीडलरविरुद्धच्या वर्चस्वाचा फायदा घेण्याचा शर्थीने प्रयत्न केला खरा; पण त्याला ६५ चालीनंतर बरोबरी मान्य करावी लागली. परिमार्जन नेगी ८१ चालींच्या दीर्घ लढतीनंतर पराजित झाला. भारताचे १७.५ गुण आहेत.

Web Title: sports news Hope of medal through Isha's victory