भारताची पाकवर मात

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

बिश्‍केक (किरगिझस्तान)- भारताने बिलियर्डसमध्ये देखील आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर वर्चस्व राखले. आघाडीची खेळाडू पंकज अडवानी आणि लक्ष्मण रावत यांच्या एकत्रित सुरेख कामगिरीने भारताने आशियाई सांघिक स्नूकर स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद मिळविले. 

भारताच्या पंकज अडवानीने प्रथम महंमद बिलालविरुद्ध लक्षवेधक कामगिरी  करून भारताचे वर्चस्व राखले. त्यानंतर त्याचा सहकारी लक्ष्मण रावत यानेदेखील भारतीय चाहत्यांना निराश केले नाही. पहिली लढत जिंकताना पंकजने ८३चा ब्रेक दिला. पाठोपाठ लक्ष्मणने ७३चा ब्रेक करताना दुसऱ्या लढतीत बाबर मसिहला पराभूत केले. निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी भारतीय जोडीला दुहेरीतही विजय मिळवणे अपेक्षित होते. 

पाकिस्तानने दुहेरीत भारतीय जोडीसमोर आव्हानच उभे केले. आव्हान राखण्यासाठी पाकिस्तानला ही लढत जिंकावीच लागणार होती. पण, रावतने मोक्‍याच्या वेळी ५०चा ब्रेक घेत भारताला पुन्हा एकदा वर्चस्व मिळवून दिले.

Web Title: sports news india Billiards

टॅग्स