राष्ट्रकुल युवा स्पर्धेत भारतास चार सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई/ नवी दिल्ली - भारताने राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह अकरा पदके जिंकली. भारताचा २८ सदस्यीय संघ केवळ सहा क्रीडा प्रकारांत सहभागी झाला होता, तरीही भारताने पदक क्रमवारीत सातवे स्थान मिळवले.

भारताचे पहिले सुवर्णपदक सोनीने (७३ किलो) ज्यूदोत जिंकले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या उरॉस निकोलिक याला हरवले. आशिष (६० किलो) अंतिम यादव (४८ किलो), रेबिना देवी चानम (५७ किलो) यांनी ब्राँझपदक पटकावले. बॉक्‍सिंगमध्ये सचिनने सुवर्ण, तर जॉनीने रौप्य पटकाविले. सचिनने वेल्सच्या जेम्स नॅथन प्रॉबर्ट याला हरवले. महंमद खान (५६ किलो) आणि एकता (५१ किलो) यांनी ब्राँझ जिंकले. झील देसाईने अंतिम लढतीत सायप्रसच्या एलिझा ओमिरोऊ हिला ६-३, ७-६ असे हरवले. तिने सिद्धांत बांठियाच्या साथीत मिश्र दुहेरीत ओमिरोऊ - नेऑस या सायप्रसच्या जोडीचा ६-४, ६-३ असा पराभव केला. सिद्धार्थने एकेरीत ब्राँझपदक जिंकले.

Web Title: sports news India has four gold medals in Commonwealth Youth