अपेक्षापूर्तीचे भारतासमोर आव्हान

अपेक्षापूर्तीचे भारतासमोर आव्हान

कोलंबो - श्रीलंकेतील निदहास तिरंगी टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपदच जिंकायला हवे, या अपेक्षापूर्तीचे दडपण भारतीय संघासमोर उद्या बांगलादेशविरुद्धच्या निर्णायक लढतीच्या वेळी असेल. जिंकलो तर जिंकणारच होतात, असे भारतीय संघाबाबत म्हटले जाईल. हरलात तर काय करीत होतात, अशी विचारणा होईल, असे दिनेश कार्तिकने सांगत अपेक्षापूर्तीचेच लक्ष्य असल्याचे सांगितले.

भारताने या स्पर्धेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. ‘आमचा संघ दुसऱ्या फळीतील आहे की अव्वल, हा प्रश्‍नच नसतो. भारताकडून विजयच अपेक्षित असतो. बांगलादेशविरुद्ध जिंकलो, तर बांगलाविरुद्धच जिंकलात ना, असे म्हटले जाते आणि हरलो तर बांगलादेशविरुद्ध हरलात, काय करत होतात, असे विचारले जाते. गेल्या एका वर्षापासून सुरू असलेली यशोमालिका कायम ठेवण्याचेच आमचे लक्ष्य आहे,’ असे दिनेशने सांगितले.

बांगलादेशविरुद्धच्या यापूर्वीच्या लढतीत सोडलेले पाच झेल भारतास सलत आहेत. प्रेक्षकच जास्त नसल्याने प्रेरणा नव्हती, हा भारतीय खेळाडूंचा दावा संघव्यवस्थापनाने खोडून काढला आहे.

‘खेळाचा उच्च दर्जा कायम राखण्याचेच आव्हान असते. आऊटफिल्ड कसे आहे, प्रेक्षक किती आहेत, कारणे चालणार नाहीत, असे आम्हाला बजावण्यात आले आहे.

भारतासमोर आव्हान सोपे नाही. श्रीलंकेतील खेळपट्ट्यांचे सध्याचे स्वरूप लक्षात घेतले, तर गोलंदाजी सामन्यात निर्णायक ठरेल. दव पडते, तसेच प्रसंगी चेंडू जास्त फिरकही घेतो, याची योग्य तडजोड मोलाची असते.

आज अंतिम लढत भारत वि. बांगलादेश  
आमने - सामने - भारत सातही टी २० लढतीत विजयी
या स्पर्धेत -  भारत दोन्ही लढतीत विजयी

हेही महत्त्वाचे
या स्पर्धेत एकही संघ अपराजित नाहीत
भारताने श्रीलंकेविरुद्धची सलामीची लढत गमावली होती
भारताने प्रेमदासा स्टेडियमवरील यापूर्वीच्या ११ पैकी ९ लढती जिंकल्या आहेत
बांगलादेश गेल्या सतरा पैकी १४ लढतींत पराभूत. तीनपैकी दोन विजय श्रीलंकेविरुद्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com