परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीयांना ‘भाव’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

बॅडमिंटन लीग लिलाव - प्रणॉयला ६२, तर श्रीकांतला ५६ लाख
हैदराबाद - बॅडमिंटन जगतात भारतीय खेळाडू आपला दबदबा तयार करत आहेत. कमाईतही ते परदेशी खेळाडूंच्या तुलनेत पुढे जात आहेत. बॅडमिंटन लीगसाठी झालेल्या लिलावात एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत यांना सर्वांत भाव मिळाला. महिलांमध्ये अर्थातच पी. व्ही. सिंधूने बाजी मारली. तिला साईना नेहवाल आणि कॅरोलिना मरीनपेक्षा जास्त भाव मिळाला.

अहमदाबाद स्मॅशर्सने प्रणॉयसाठी ६२ लाख मोजले, तर अवध वॉरियर्सने श्रीकांतला ५६.१ लाख मोजून आपल्या संघात घेतले. हरहुन्नरी समीर वर्मा (मुंबई रॉकेट्‌स ५२ लाख), अजय जयराम (उत्तर पूर्व वॉरियर्स ४५ लाख) यांनीही चांगला भाव खाल्ला. काल झालेल्या लिलावात आठही संघमालकांची सर्वोत्तम खेळाडू आपापल्या संघात घेण्यासाठी चांगली स्पर्धा झाली.

सध्या महिलांच्या बॅडमिंटनमध्ये भरारी घेत असलेली सिंधू आणि भारताची ‘पहिली फुलराणी’ साईना यांना त्यांच्या संघांनी कायम राखले. नियमानुसार ‘रिटेन’ खेळाडूंना गतवेळच्या रकमेपेक्षा २५ टक्के अधिक रक्कम मिळाली. ऑलिंपिक आणि जागतिक रौप्यपदक विजेती सिंधू ४८ लाख ७५ हजारांची मानकरी ठरली. गतवेळच्या लिलावात सिंधूसाठी ३३ लाख मोजून अवध वॉरियर्सने आपल्या संघात घेतले होते. 

दुहेरीच्या खेळाडूंमध्ये सत्विक साईराज, कोरियाचा ली युंग डे आणि रशियाचा व्लादिमीर इव्हानोव यांना आपल्या संघांनी कायम राखल्यामुळे त्यांचा लिलाव झाला नाही.  

महिलांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या तेई झु यिंग 
हिच्याद्वारे लिलावास सुरवात झाली. तिला ५२ लाख मोजून अहमदाबाद संघाने आपल्या संघात घेतले. 

रिओ सुवर्णपदक महिला विजेती कॅरोलिनाला हैदराबाद संघाने ५० लाखांच्या मूलभूत रकमेतून कायम ठेवले; तर नवा जागतिक विजेता 
आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू डेन्मार्कच्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसनसाठी बंगळूरच्या संघाने ५० लाख मोजले.

लिलावात मला एवढी रक्कम मिळेल असे वाटले नव्हते. गतवेळच्या तुलनेत १० ते १५ लाख जास्त रक्कम मी अपेक्षित धरली होती. अहमदाबाद संघातून खेळण्यासाठी आणि नव्या हंगामासाठी मी उत्सुक आहे.
- एस. एस. प्रणॉय

Web Title: sports news Indian players