रियोतील अपयश धुऊन काढल्याचे अधिक समाधान

रियोतील अपयश धुऊन काढल्याचे अधिक समाधान

नवी दिल्ली - जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा आनंद निश्‍चित आहे; पण त्याहीपेक्षा रियो ऑलिंपिकमधील अपयश धुऊन टाकल्याचे मला अधिक समाधान आहे, अशा शब्दांत जागतिक सुवर्णपदक विजेत्या मीराबाईने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मीराबाई म्हणाली, ‘‘मी आज जे काही मिळवलं आहे ते प्रशिक्षक विजय शर्मा यांच्याशिवाय शक्‍य नव्हते. सर्वोच्च पातळीवर पदक मिळविण्यासाठी माझ्याइतकेच कष्ट प्रशिक्षक विजय यांनी घेतले आहेत.’’ मीराबाईने या वेळी बोलताना रियो ऑलिंपिकमधील अपयशाचाही उल्लेख केला. ती म्हणाली, ‘‘रियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवू शकले नाही, याचे शल्य अजूनही मनात आहे. ते कधीही विसरता येणार नाही. तेच अपयश आज या सुवर्णपदकाने पुसून टाकले. माझ्या कामगिरीत सुधारणा करण्यास वाव आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून आता पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचे माझे प्रयत्न असतील.’’

जबरदस्त कामगिरी
भारताला तब्बल २४ वर्षांनी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. ही कामगिरी जबरदस्त आणि प्रोत्साहित करणारी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,‘‘रियोतील अपयशाने मीराबाई खचली होती; पण मोठ्या जिद्दीने ती उभी राहिली. एवढे मोठे अपयश विसरून जाणे कठीण असते. या कामगिरीबद्दल महासंघाच्या वतीने तिचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com