भारतीय महिला उपांत्य फेरीत

पीटीआय
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

काकमिगहारा (जपान) - भारतीय महिला हॉकी संघाने आपले जबरदस्त प्रदर्शन कायम ठेवत आशिया  करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय महिला संघाने गुरुवारी झालेल्या सामन्यात कझाकिस्तानचा ७-१ असा धुव्वा उडवला.

पहिल्या सामन्यापासून जबरदस्त आत्मविश्‍वासाने खेळणाऱ्या भारतीय महिलांचा प्रत्येक विजय त्यांचा खेळ उंचावल्याची साक्ष देणारा ठरला. कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गुरजित कौरने तीन, तर दीप ग्रेस एक्का आणि नवनीत कौर यांनी प्रत्येकी दोन गोल केले. या सामन्यातील तीन गोलसह गुरजित हिने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सहा गोल केले आहेत.

आजच्या सामन्याची सुरवात खरे तर सनसनाटी झाली होती. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला व्हेरा डोमाश्‍नेवा हिने गोल करून कझाकिस्तानला आघाडी मिळवून दिली होती. चौथ्याच मिनिटाला गुरजितने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली.बरोबरीनंतर भारतीय महिलांनी मागे वळून बघितले नाही. त्यांनी अगदीच एकतर्फी खेळ केला. सोळाव्या मिनिटाला दीप एक्काने दुसरा गोल केल्यावर पाच मिनिटात म्हणजे २२ आणि २७ व्या मिनिटाला नवनीतने दोन गोल करून भारताची आघाडी वाढवली. उत्तरार्धात दीपने ४१व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. त्यानंतर गुरजितने ४२ आणि ५६व्या मिनिटाला गोल केले.

Web Title: sports news indian women hockey