वेस्ट इंडीजला अखेर  वर्ल्ड कपचे ‘तिकीट’

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

हरारे - पुढील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता फेरी खेळण्याचे अग्निदिव्य वेस्ट इंडीजने अखेर पावसाच्या मदतीने पार केले. डकवर्थ लुईसच्या  नियमाने स्कॉटलंडचा अवघ्या पाच धावांनी पराभव करणारा वेस्ट इंडीजचा संघ २०१९ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळताना अखेर दिसणार आहे.

स्कॉटलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यावर त्यांचे भवितव्य  अवलंबून होते. ख्रिस गेल शून्यावर बाद झाल्यावर एविन लुईस, मार्लन सॅम्युअल्स यांनी अर्धशतके केल्यानंतरही विंडीजचा डाव १९८ धावांत संपला. 

या आव्हानासमोर स्कॉटलंडने अडखळत्या सुरवातीनंतर ३५ षटकांत ५ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारली होती; परंतु ३५.२ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ते पाच धावा दूर होते. 

संक्षिप्त धावफलक 
वेस्ट इंडीज ः ४८.४ षटकांत सर्वबाद १९८ (ख्रिस गेल ०, एविन लुईस ६६, मार्लन सॅम्युअल्स ५१, कार्लस ब्रॅथवेट २४, साफयन शरीफ ३-२७, ब्रॅड व्हिल ३-३४, मिशेल लिसेक २-३६) वि. वि. स्कॉटलंड ः ३५.२ षटकांत ५ बाद १२५ (रिची बॅरिंग्टन ३३, जॉर्ज मुनसे ३२, केमार रोच २-२०, मुनसे २-३५)

Web Title: sports news IPL West Indies