कोरियन स्पर्धेत सिंधूवरच आशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सोल - जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेतील उपविजेती पी. व्ही. सिंधू हीच कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आशास्थान असेल. साईना नेहवाल आणि के. श्रीकांत यांनी या स्पर्धेत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

जागतिक स्पर्धेनंतर होणाऱ्या या स्पर्धेत सिंधू हिने एकटीनेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. साईना आणि श्रीकांत यांनी या नंतर होणाऱ्या जपान ओपन स्पर्धेच्या तयारीसाठी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूची सलामीची लढत हाँग काँगच्या चेऊंग न्हान यी हिच्याशी होणार आहे. 
पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय, बी. साई प्रणित, समीर वर्मा, सौरभ वर्मा हे खेळाडू खेळणार आहेत. 

Web Title: sports news korea super series badminton competition