‘टीम युरोप’ने पटकाविला लेव्हर करंडक

पीटीआय
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

प्राग (चेक प्रजासत्ताक) - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या रॉजर फेडररच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ‘टीम युरोप’ने पहिल्यावहिल्या लेव्हर करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. टीम युरोपच्या फेडररने निर्णायक लढतीत विश्‍व संघाच्या निक किर्गीओसविरुद्ध सुपर टायब्रेकमध्ये नोंदविलेला विजय निर्णायक ठरला. 

रंगतदार झालेली लढत फेडररने ४-६, ७-६(८-६), ११-९ अशी जिंकली. या विजयाने ‘टीम युरोप’ने विश्‍व संघावर १५-९ अशी विजयी आघाडी मिळवली. फेडररने विजय मिळविला असला तरी त्याला किर्गीओसविरुद्ध सफाईदार खेळ करता आला नाही. त्याची सर्व्हिसच आज झाली नाही. पहिल्या सेटमध्ये त्याची सर्व्हिस एकदा ब्रेक झाली, तर त्याला ब्रेकची संधीही मिळाली नाही. सुपर टायब्रेकमध्ये मात्र फेडररने बाजी मारली. 

‘टीम युरोप’ने दुसऱ्या दिवशी ९-३ अशा आघाडीने सुरवात करताना त्यांना पहिल्या दुहेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. जॉन इस्नेर-जॅक सॉक यांनी टीम युरोपच्या टोमास बर्डिच-मरिन चिलीच यांचा पराभव केला. त्यानंतर एकेरीच्या लढतीत ॲलेक्‍झांडर झ्वेरेवने ‘टीम युरोप’ला आघाडीवर नेताना सॅम क्वेरेचा पराभव केला. रॅफेल नदालला मात्र जोरदार सर्व्हिस करणाऱ्या जॉन इस्नेरविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे फेडरर आणि किर्गीओस यांच्यातील लढतीला महत्त्व आले होते. फेडररने आफला अनुभव पणाला लावून मिळविलेला विजयच शेवटी निर्णायक ठरला.

Web Title: sports news Lever trophy