मेस्सीचे मानधन आता आठवड्याला पाच लाख पौंड?

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

माद्रिद - लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाबरोबरील आपला करार २०२१ पर्यंत वाढवला आहे. त्यासाठी बार्सिलोना आता त्याला प्रत्येक आठवड्याला पाच लाख पौंड देणार असल्याचे समजते. अर्थातच मेस्सीबरोबर करार झाल्याचे जाहीर करताना बार्सिलोनाने आर्थिक तपशील दिलेला नाही. 

मेस्सीला १७ वर्षांपूर्वी बार्सिलोनाने करारबद्ध केले. आता तो ३४ वर्षांचा होईपर्यंत क्‍लबसोबत असेल. मेस्सी बार्सिलोना सोडून अर्जेंटिनातील क्‍लबकडून खेळणार असल्याची चर्चा होती. मेस्सीनेही सीए नेवेल ओल्ड बॉईज क्‍लबकडून खेळण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. पण, अखेर त्याने आपल्या तेराव्या वर्षापासून विश्‍वास दाखवलेल्या बार्सिलोनाबरोबच नव्याने करार करण्याचा निर्णय घेतला आहे. बार्सिलोनानेच याबाबतची घोषणा केली आहे. याबाबतच्या करारावर अधिकृत स्वाक्षरी मेस्सी पुन्हा बार्सिलोना संघात परतल्यावरच होणार आहे. 

मेस्सीबरोबरील नव्या कराराचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही; पण त्याला आठवड्याला पाच लाख पौंड बार्सिलोना देणार आहे. याव्यतिरिक्त त्याला खास बोनस, तसेच जाहिरातीच्या करारातूनही रक्कम मिळेल, असेही काहींचे मत आहे. मेस्सीच्या खरेदीसाठी मॅंचेस्टर सिटीने कसोशीने प्रयत्न केले; पण बार्सिलोनाच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला स्पॅनिश साखळीत खेळण्यासाठी तयार केले. 

Web Title: sports news Lionel Messi