आपटे यांच्या ‘कॉल’ला कार्यकारिणीचा प्रतिसाद

आपटे यांच्या ‘कॉल’ला कार्यकारिणीचा प्रतिसाद

पुणे - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारिणीने लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीला एकमताने सहमती दर्शवली आहे. अध्यक्ष ॲड. अभय आपटे यांनी घेतलेल्या भूमिकेला कार्यकारिणीने एकमताने प्रतिसाद दिला. आता वर्षअखेर विशेष सर्वसाधारण सभेत या ठरावाला अंतिम मंजुरी अपेक्षित आहे. याच शिफारशींमुळे एमसीएचे अध्यक्षपद आणि बीसीसीआय सचिवपद सोडावे लागलेल्या अजय शिर्के यांनी बजावलेली रनरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

गेल्या शनिवारी ही बैठक झाली. लोढा समितीच्या शिफारशींचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला असून याचिका प्रलंबित आहे.

याविषयी ॲड. आपटे यांनी सांगितले, की शिफारशींना सहमती न दर्शविल्यामुळे अनेक राज्य संघटना अधांतरी आहेत. अशी स्थिती फार काळ ठेवता येणार नाही. विरोध कायम ठेवल्यास कामकाज करता येणार नाही. कोणतीही व्यक्ती आणि त्याच्या मत- भूमिकेपेक्षा संघटना मोठी असते. संघटनेची आर्थिक स्थिती सुधारणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या शिफारशींविषयी सहमती दाखविणारा ठराव मंजूर करावा, अशी माझी भूमिका होती. त्यास माजी अध्यक्ष अजय शिर्के यांचा पाठिंबा मिळाला. आता घटनेनुसार योग्य तरतुदींचे पालन करून मी वार्षिक सभेची सूचना जारी करेन.

लोढा शिफारशींवरून वाद सुरू होऊन त्यास आता चार वर्षे झाली आहेत. यंदा दोन जानेवारीला मला सचिवपद सोडावे लागले. त्याससुद्धा लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. हा वाद इतक्‍यात संपुष्टात येईल असे वाटत नाही. अंतिम आदेश केव्हा येईल हे कुणीच सांगू शकत नाही. एमसीएला दैनंदिन कारभार चालवायचा आहे. त्यामुळे संघटनेला प्राधान्य देत त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे अडचणी दूर होऊन संघटना सुरळीत चालू शकेल.
- अजय शिर्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com