सर्वोत्तम एनजीओचा ‘लक्ष्य’ला राष्ट्रीय पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - पुण्यातील ‘लक्ष्य’ या क्रीडा क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या एनजीओला देशातील क्रीडा क्षेत्रासाठीची ‘सर्वोत्तम एनजीओ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बंगळूर येथे पार पडलेल्या जागतिक सीएसआर दिनानिमित्त ‘राष्ट्रीय सीएसआर लीडरशिप काँग्रेस’मध्ये झालेल्या एका समारंभात मायब्रेन इंटरनॅशनलचे संचालक ॲलिस्टर स्कोफिल्ड यांच्या हस्ते ‘लक्ष्य’चे अध्यक्ष विशाल चोरडिया आणि क्रीडा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभिजित कुंटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. फेब्रुवारी २००९च्या दरम्यान लक्ष्य या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेने शंभरहून अधिक गुणवान क्रीडापटूंची निवड केली.

पुणे - पुण्यातील ‘लक्ष्य’ या क्रीडा क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या एनजीओला देशातील क्रीडा क्षेत्रासाठीची ‘सर्वोत्तम एनजीओ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बंगळूर येथे पार पडलेल्या जागतिक सीएसआर दिनानिमित्त ‘राष्ट्रीय सीएसआर लीडरशिप काँग्रेस’मध्ये झालेल्या एका समारंभात मायब्रेन इंटरनॅशनलचे संचालक ॲलिस्टर स्कोफिल्ड यांच्या हस्ते ‘लक्ष्य’चे अध्यक्ष विशाल चोरडिया आणि क्रीडा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभिजित कुंटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. फेब्रुवारी २००९च्या दरम्यान लक्ष्य या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेने शंभरहून अधिक गुणवान क्रीडापटूंची निवड केली. त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सर्व बाबतींत साहाय केले. सध्या विविध उद्योग समूहांच्या साह्याने २६ नामवंत क्रीडापटूंना लक्ष्यच्या वतीने सर्वतोपरी पाठिंबा देण्यात येत आहे. त्यामुळे हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.

Web Title: sports news national award to laksh