ऋग्वेद, युवराज, पिंकेश, लोकेश विजेते

पीटीआय
रविवार, 21 जानेवारी 2018

चेन्नई  - राष्ट्रीय डर्ट ट्रॅक मालिकेत पुण्याच्या ऋग्वेद बारगुजेने वरिष्ठ, तर युवराज कोंडे देशमुखने ज्युनियर गटात विजेतेपद मिळविले. अनुभवी पिंकेश ठक्कर दोन गटांत विजेता ठरला, तर लोकेश भोसलेने नवोदित गटात बाजी मारली.

ऋग्वेदने पहिल्या मोटोत पहिला, तर दुसऱ्या मोटोत दुसरा क्रमांक मिळविला. दुसरी शर्यत नाशिकच्या यश पवारने जिंकली, पण एकूण क्रमवारीत ऋग्वेदचे ११४, तर यशचे १०१ गुण झाले. युवराजने तिसरा क्रमांक मिळविला. ज्युनियर गटात युवराजने ६० गुणांसह वर्चस्व राखले. सार्थक चव्हाण दुसरा आला.

ऋग्वेदने सांगितले की, पहिल्या शर्यतीत मी सुरवात चांगली करीत आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत टिकविली. दुसऱ्या शर्यतीत मात्र सुरवात चांगली झाली नाही. त्यामुळे धोका न पत्करता दुसरा क्रमांक टिकविण्यावर लक्ष केंद्रित केले.

मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर प्रथमच डर्ड ट्रॅक स्पर्धा पार पडली. सहाशे मीटरवर दोन मोठे डावे कॉर्नर आणि एस आकाराचे दोन अडथळे होते. 

निकाल - ज्युनियर - युवराज कोंडे देशमुख (पुणे), सार्थक चव्हाण (पुणे), श्‍लोक घोरपडे (सातारा). नवोदित - पहिली शर्यत - लोकेश भोसले (पुणे), श्रीनिवास कोकाटे (इचलकरंजी), अश्‍पाक मुलाणी (सांगली). दुसरी शर्यत - श्रीनिवास कोकाटे, लोकेश भोसले, अश्‍पाक मुलाणी. खुला गट क - पहिली शर्यत - पिंकेश ठक्कर (पुणे), लोकेश भोसले (पुणे), श्रीनिवास कोकाटे (इचलकरंजी). दुसरी शर्यत - पिंकेश ठक्कर, लोकेश भोसले, श्रीनिवास कोकाटे. खुला गट ब - पहिली शर्यत - पिंकेश ठक्कर (पुणे), श्रीनिवास कोकाटे (इचलकरंजी), लोकेश भोसले (पुणे). दुसरी शर्यत - पिंकेश ठक्कर (पुणे), लोकेश भोसले (पुणे), अश्‍पाक मुलाणी (सांगली). 

खुला गट अ - पहिली शर्यत - ऋग्वेद बारगुजे (पुणे), यश पवार (नाशिक), युवराज कोंडे देशमुख.

दुसरी शर्यत - यश पवार (नाशिक), ऋग्वेद बारगुजे (पुणे), युवराज कोंडे देशमुख (पुणे).

Web Title: sports news National Dirt Track Series Chennai