कुमार राष्ट्रीय खो-खोत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

मुंबई - मणिपूर येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने मुले आणि मुलींच्या विभागाचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट संपादन केले. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार महाराष्ट्राच्या शुभम उतेकरने; तर मुलींमध्ये जानकी पुरस्कार कोमल दारवटकरने मिळवला.

महाराष्ट्राच्या मुलांचे हे सलग १३ वे, तर मुलींचे चौथे विजेतेपद आहे.
मुलांच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरकरांचे कडवे आव्हान २४-१९ असे मोडून काढले. मध्यंतरापर्यंत कोल्हापूरकरांनी छान लढत दिली. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात त्यांचे आव्हान फिके पडले. 

महाराष्ट्राच्या शुभम उतेकर आणि वृषभ वाघने चांगले संरक्षण केले. संदेश जाधवने आक्रमणात चमक दाखवली. कोल्हापूरच्या अविनाश देसाई व अभिनंदन पाटील यांनी चांगली लढत दिली.

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या बलाढ्य संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी कर्नाटकला ८-४  असे एक डाव व चार गुणांनी चारीमुंड्या चीत केले.

Web Title: sports news national kho kho competition maharashtra