ॲमिओ रेसिंग मालिका देशातील प्रमुख ट्रॅकवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे- राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमिओ करंडक स्पर्धेसाठी २७ व २८ जानेवारी रोजी पुण्यातील खराडी येथील इंडिकार्टिंग ट्रॅकवर चाचणी होईल. फोक्‍सवॅगन मोटरस्पोर्टस इंडियातर्फे या मालिकेचे आयोजन केले जाते. यंदाच्या मोसमात देशातील तिन्ही प्रमुख रेस ट्रॅकवर शर्यती होतील. चेन्नईतील मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लब (एमएमएससी), कोइमतूरमधील करी मोटर स्पीडवे आणि ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे फेऱ्या पार पडतील.

‘वन मेक सिरीज’चे हे नववे वर्ष आहे. वन मेक सिरीजनुसार सर्व स्पर्धकांना तांत्रिकदृष्ट्या एकाच प्रकारच्या आणि सारख्याच क्षमतेच्या कार मिळतात. यंदाची मालिका ‘एमएमएससी’ने ‘एफएमएससीआय’ या शिखर संघटनेच्या मान्यतेने आयोजित केली आहे. या मालिकेमुळे देशाच्या विविध भागांमधील स्पर्धकांना क्षमता दाखविण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. गेल्या वर्षी २० स्पर्धक सहभागी झाले. निवड प्रक्रियेत स्पर्धकांच्या विविध चाचण्या होतील. 

हौशी तसेच ध्येयनिष्ठ स्पर्धकांसाठी आम्ही व्यावसायिक पातळीवर ही वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅक रेसिंग मालिका आयोजित करीत आहोत. नवव्या वर्षांत पदार्पण करीत असताना आमचे रेसिंगला चालना देण्याचे आणि त्याद्वारे भारतीय रेसिंगचा विकास करण्याचे प्रयत्न आहेत. यंदाची मालिकासुद्धा संस्मरणीय ठरेल.
- शिरीष विस्सा, फोक्‍सवॅगन इंडियाचे रेसिंगप्रमुख

Web Title: sports news National Racing Series