ऑलिंपिक २०२४ पॅरिस, तर २०२८ लॉस एंजलिसला

रॉयटर्स
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

लॉस एंजलिस/पॅरिस  - क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमानपदाचा निर्णय मतदानाशिवाय घेण्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला यश आले. पॅरिस आणि लॉस एंजलिस या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सामजंस्याने घेतलेल्या निर्णयामुळे आता ऑलिंपिक २०२४ पॅरिस, तर २०२८ मध्ये लॉस एंजलिसला होईल. 

पॅरिस आणि लॉस एंजलिस या दोन्ही शहरांनी २०२४च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी दर्शविली होती. गेल्यावर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या छाननीनंतरच ही दोन नावे शर्यतीत राहिली होती. त्या वेळी बोस्टन, हॅम्बुर्ग, रोम आणि बुडापेस्ट या शहरांनी वाढता खर्च आणि जनतेकडून असणारा विरोध लक्षात घेऊन यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी दोन्ही शहरांनी आपापसात चर्चा करून कुणी प्रथम ऑलिंपिकचे आयोजन करायचे याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ऑलिंपिक समितीने केले होते. यजमानपदासाठी संभाव्य मतदान आणि त्यानंतरचे मतभेद टाळण्यासाठी हा सगळा प्रयत्न होता. ऑलिंपिक समितीच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. लॉस एंजलिसने २०२४च्या यजमानपदाचा हट्ट सोडून २०२८मध्ये आयोजन करण्याची तयारी दर्शविली आणि हा सगळा प्रश्‍न सुटला. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दोन्ही  शहरांनी घेतलेला हा समजूतीचा निर्णय आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत कार्यकारी समितीसमोर ठेवण्यात येईल आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी सांगितले. 

पॅरिस आणि लॉस एंजलिस वैयक्तिक जबाबदारीवर या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. कारण, २०१८ मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक समितीने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

Web Title: sports news Olympic Paris Los Angeles