प्रणॉय, कश्‍यप उप-उपांत्यपूर्व फेरीत

पीटीआय
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

ऑकलंड - एच. एस. प्रणॉय, पी. कश्‍यपसह सिरील आणि सौरभ वर्मा यांनी न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

गेल्याच महिन्यात अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या प्रणॉयने इंडोनेशियाच्या फिर्मन अब्दुल खोलिक याचे आव्हान २३-२१, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये परतवून लावले. कश्‍यपने न्यूझीलंडच्या ऑस्कर गुओ याला २१-९, २१-८ असे पराभूत केले. 

प्रणॉयची गाठ आता हाँगकाँगच्या दहाव्या मानांकित वेई नान, तर कश्‍यपची गाठ भारताच्याच सौरभ वर्माशी पडणार आहे. सातवे मानांकन असणार सौरभने आज इंडोनेशियाच्या हेन्‍रिखो खो विबोवो याच्यावर २१-१६,  २१-१६ असा सहज विजय मिळविला. सिरील वर्मा यानेदेखील आपली आगेकूच कायम राखली आहे. त्याने इंडोनेशियाच्याच सपुत्रा विकी अंगा याचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. 

भारताच्या अन्य युवा साहिल सिपानी आणि नीरज वसिष्ठ यांना मात्र आपले आव्हान गमवावे लागले. साहिलला अकराव्या मानांकित लिन यू सिएन याने ९-२१, ८-२१ आणि नीरजला ऑस्ट्रेलियाच्या ॲन्थोनी ज्योकडून १६-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. प्रुतल जोशीला अव्वल मानांकित त्झु वेई वॅंग याच्याकडून १३-२१, २२-२४ असा पराभव पत्करावा लागला. 

महिला दुहेरीत संयोगित घोरपडे-प्राजक्त सावंत जोडीचे आव्हानही संपुष्टात आले. त्यांना जपानच्या चौथ्या मानांकित आयाको साकुरामोटो-युकिको ताकाहाता जोडीने भारतीय जोडीवर २१-१५, २१-१८ असा विजय मिळविला. प्राजक्ताला मिश्र दुहेरीतही पराभवाचा सामना करावा लागला. 

मलेशियाच्या योगेंदरन क्रिष्णन याच्या साथीत खेळणाऱ्या प्राजक्ताला चीनच्या फॅन क्‍वीयुये-झुआनझुआन लियू जोडीकडून १३-२१, १३-२१ अशी हार पत्करावी लागली.

Web Title: sports news open badminton Prannoy, Kashyap