प्रणॉय, सौरभ वर्माचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पीटीआय
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

ऑकलंड - भारताच्या एच.  एस. प्रणॉय आणि सौरभ वर्मा यांनी न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धेत गुरुवारी झालेल्या एकेरीच्या लढतीत प्रणॉयने हाँगकाँगच्या वेई नान याचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला. त्याची गाठ आता तैवानच्या ११व्या मानांकित लिन यू सिएन याच्याशी पडणार आहे. 

माजी राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्माने आपल्याच देशाच्या अनुभव पी. कश्‍यप याचे आव्हान २१-१८, १३-२१, २१-१६ असे परतवून लावले. ही लढत १ तास ४ मिनिटे चालली. त्याची गाठ आता हाँगकाँगच्या ली चेऊक यियू याच्याशी पडेल. त्याने इस्राएलच्या मिशा झिल्बेर्मान याचा २१-१०, २१-१४ असा पराभव केला. भारताच्या सिरील वर्मा याचे आव्हान मात्र संपुष्टात आले. त्याला तैवानच्या शिया हुंग लू याच्याडून १३-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.

प्रणॉय तीन वर्षांपूर्वी मलेशिया ओपन स्पर्धेत वेईकडून हरला होता. पण, या वेळी त्याने अधिक सरस खेळ करत त्या पराभवाची परतफेड केली. प्रणॉय पहिल्या गेममध्ये ९-५ असा आघाडीवर होता. पण, वेईने लागोपाठ गुण घेत १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर लांबवर फटके मारताना प्रणॉयचे खेळावरील नियंत्रण काहिसे सुटले आणि वेई १३-१० असा आघाडीवर राहिला. त्याचवेळी प्रणॉयने सलग पाच गुणांची कमाई करताना चित्र पालटवले. त्यानंतर त्याने नेटवर सुरेख खेळाचे प्रदर्शन करत गेम जिंकली. 

दुसऱ्या गेममध्येही वेई सुरवातीपासून १०-६ आघाडीवर होता. पण, प्रणॉयने याही वेळी पिछाडी भरून काढत ११-११ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या गेममध्ये १६व्या गुणांपर्यंत बरोबरीतच होता. त्या वेळी वेईचे फटके कोर्टबाहेर गेले आणि त्याचा फायदा उठवत प्रणॉयने मिळविलेली १८-१६ अशी आघाडी टिकवून ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

Web Title: sports news Open Badminton Tournament