हरिकृष्णने ॲडम्सला रोखले

पीटीआय
रविवार, 9 जुलै 2017

जीनिव्हा (स्वित्झर्लंड) - भारताचा ग्रॅंडमास्टर पी. हरिकृष्णने फिडे ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धेत इंग्लंडचा ग्रॅंडमास्टर मायकेल ॲडम्सला दुसऱ्या फेरीत बरोबरीत रोखले. सुरवातीला स्थिती भक्कम असूनही हरीला निर्णायक विजय मात्र नोंदविता आला नाही. जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या हरिकृष्णकडे पांढरी मोहरी होती. त्याने आक्रमक सुरवात केली होती. ३८ चाली झाल्यानंतर ॲडम्सने किंचित सरस स्थिती असूनही बरोबरीचा प्रस्ताव ठेवला. हरीने तो मान्य केला. हरीने पहिल्या फेरीत रशियाचा ग्रॅंडमास्टर अलेक्‍झांडर रियाझॅनत्सेव याला हरविले होते. हरीचे दीड गुण आहेत.

जीनिव्हा (स्वित्झर्लंड) - भारताचा ग्रॅंडमास्टर पी. हरिकृष्णने फिडे ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धेत इंग्लंडचा ग्रॅंडमास्टर मायकेल ॲडम्सला दुसऱ्या फेरीत बरोबरीत रोखले. सुरवातीला स्थिती भक्कम असूनही हरीला निर्णायक विजय मात्र नोंदविता आला नाही. जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या हरिकृष्णकडे पांढरी मोहरी होती. त्याने आक्रमक सुरवात केली होती. ३८ चाली झाल्यानंतर ॲडम्सने किंचित सरस स्थिती असूनही बरोबरीचा प्रस्ताव ठेवला. हरीने तो मान्य केला. हरीने पहिल्या फेरीत रशियाचा ग्रॅंडमास्टर अलेक्‍झांडर रियाझॅनत्सेव याला हरविले होते. हरीचे दीड गुण आहेत. तिसऱ्या फेरीत त्याच्यासमोर अझरबैजानच्या सहाव्या स्थानावरील शख्रीयार मामेद्यारोव याचे आव्हान असेल. अलीकडेच शामकीरमधील स्पर्धेत हरीची त्याच्याशी बरोबरी झाली होती.

Web Title: sports news P. Harikrishnan chess