ऑलिंपिकजेतीच्या आईने घेतला साईना, सिंधूबरोबर सेल्फी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

मुंबई - कॅरोलिन मरिन ही भारतीय क्रीडारसिकांना पी. व्ही. सिंधूचे ऑलिंपिक विजेतेपदाचे स्वप्न भंग करणारी स्पेनची बॅडमिंटनपटू म्हणूनच माहिती आहे. तिच्या आईने जागतिक स्पर्धेच्या वेळी साईना नेहवाल, तसेच पी. व्ही. सिंधू यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी प्रतीक्षा केली.

जगभरात भारतीय वाढत असल्याने साईना, सिंधूला सेल्फीसाठी केला जाणारा आग्रह नवीन नाही. किंबहुना अनोळखी व्यक्तींबरोबर सेल्फी काढण्याची त्यांना आता सवय झाली आहे, पण प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कुटुंबीयांनी केलेला आग्रह त्यांच्यासाठी नवीन होता. 

साईनाचे वडील हरवीर नेहवाल आणि सिंधूची आई पी. विजयालक्ष्मी हे जागतिक स्पर्धेसाठी ग्लासगो येथे गेले होते. तिथे त्यांचे स्वागत कॅरोलिना मरिनची आई टोनी यांनी केले. कॅरोलिना रिओ ऑलिंपिकविजेती आहे, तसेच ती माजी जगज्जेतीही आहे. टोनी मरिन भारताच्या ऑलिंपिक, तसेच जागतिक पदक विजेत्यांबरोबरील सेल्फीसाठी थांबल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबतही आपले फोटो काढून घेतले. मरिनने गतवर्षी ऑलिंपिकच्या अंतिम लढतीत सिंधूला, तर २०१५च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम लढतीत साईनास हरवले होते. 

जागतिक स्पर्धेत सिंधू, साईना, तसेच कॅरोलिन मरिन यांना जागतिक विजेत्या नोझोमी ओकुहारा हिच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. ओकुहाराने मरिनला उपांत्यपूर्व फेरीत, साईनाला उपांत्य फेरीत, तसेच सिंधूला अंतिम फेरीत हरवले होते. 

Web Title: sports news p v sindhu badminton