स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्याची सिंधूला आशा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नवी दिल्ली - घोट्याचा स्नायू दुखावलेली पी. व्ही. सिंधू अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही; मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होईपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होण्याची आशा सिंधू बाळगून आहे. 

नवी दिल्ली - घोट्याचा स्नायू दुखावलेली पी. व्ही. सिंधू अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही; मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होईपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होण्याची आशा सिंधू बाळगून आहे. 

गोपीचंद अकादमीत सराव करीत असताना सिंधूचा उजवा घोटा दुखावला होता. त्यानंतर लगेचच एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्यात तिच्या हाडाला किंवा स्नायूला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे लक्षात आले.  ‘स्पर्धेची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे सुरू आहे. अर्थात, ही तयारी सुरू असतानाच दुर्दैवाने माझा घोटा दुखावला. स्पर्धा सुरू होईपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होण्याची आशा बाळगून आहे. तोपर्यंत परिस्थिती नक्कीच सुधारली असेल,’ असे सिंधूने सांगितले.

सिंधूने ऑलिंपिक; तसेच जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. सुपर सीरिज स्पर्धेच्या तुलनेत सिंधूसमोर फारसे आव्हानही नसेल; पण सिंधू सावध आहे.  गतस्पर्धेत मी ब्राँझ जिंकले होते. या वेळी नक्कीच त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याचे लक्ष्य असल्याचे सिंधूने सांगितले.

Web Title: sports news p. v. sindhu badminton common wealth games