सिंधूची अंतिम फेरीत धडक

वृत्तसंस्था
रविवार, 17 डिसेंबर 2017

दुबई - सुपर सिंधूने आणखी एक शानदार विजय मिळवत दुबई सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या वर्षातील या अखेरच्या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने चीनच्या युफी चेनचे आव्हान दोन गेममध्ये २१-१५, २१-१८ असे मोडून काढले. उद्या होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात जपानची अकेने यामामुची सिंधूची प्रतिस्पर्धी असेल.

२२ वर्षीय सिंधूच्या तुलनेत युफी चेनन अनुभवात थोडी कमी असली तरी या दोघींमध्ये आजच्या सामन्याअगोदर झालेल्या पाच सामन्यांमध्ये सिंधू ३-२ अशी पुढे होती; तर २०१७ मधील दोघींचा एकमेकींविरुद्धचा गुणफलक २-२ असा होता. त्यामुळे आजचा सामना रंगदार होईल, अशी अपेक्षा होती; परंतु सिंधूने तिचे आव्हान दोन गेममध्येच संपुष्टात आणले.

या दुबई सुपरसीरिजमध्ये सिंधू कमालीची फॉर्मात खेळत आहेत. सलग तीन विजय मिळवून तिने गटात अव्वल क्रमांक मिळवला होता. या दरम्यान अवघा एकच गेम गमावला असल्यामुळे तिच्या ताकदीवर खेळाची कल्पना युफीला होती. तरीही तिने त्याचे दडपण न घेता सिंधूला झुंझवण्याचा प्रयत्न केला. 

जागतिक क्रमवारीत सध्या तिसऱ्या स्थानी असलेल्या सिंधूने पहिल्या गेममध्ये ५-० अशी शानदार सुरुवात केली; परंतु युफीने तेवढाच जोरदार प्रतिकार केला. १०-१० अशा बरोबरीनंतर सामन्यातील चुरस वाढणार, असे चित्र असताना सिंधूने आपल्या उंचीचा फायदा घेत मारलेले स्मॅश कमालीचे प्रभावी होते. त्यामुळे सिंधूने पुढे १० गुण घेतले, तर युफीला पाचच गुण मिळाले. त्यामुळे गुणफलक २०-१५ असा झाला. पुढचा एक गुण मिळवून गेम जिंकण्यासाठी सिंधूला फारसा वेळ लागला नाही.

दुसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंची वाटचाल बरोबरीत होती; पण ३७ शॉर्टची एक रॅली जिंकून युफीने १५-१५ अशी बरोबरी साधली. यावेळीही सिंधूने पकड ढिली होऊ दिली नाही आणि अंतिम क्षणी वेग वाढवत हा गेम २१-१८ असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.

Web Title: sports news p v sindhu Dubai Super Series Badminton