प्रो-कबड्डीत गटसाखळी, तसेच सुपर लीगही?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - प्रो-कबड्डीतील संघातच केवळ वाढ झालेली नाही; तर या स्पर्धेच्या स्वरूपातही बदल करण्याचा विचार होत आहे. प्राथमिक संपूर्ण साखळीऐवजी आता गटसाखळी आणि सुपर साखळी लढती खेळवण्याचा विचार होत आहे. हा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. यामुळे स्पर्धेतील रंगत जास्त वाढेल, असा विचार होत आहे. 

मुंबई - प्रो-कबड्डीतील संघातच केवळ वाढ झालेली नाही; तर या स्पर्धेच्या स्वरूपातही बदल करण्याचा विचार होत आहे. प्राथमिक संपूर्ण साखळीऐवजी आता गटसाखळी आणि सुपर साखळी लढती खेळवण्याचा विचार होत आहे. हा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. यामुळे स्पर्धेतील रंगत जास्त वाढेल, असा विचार होत आहे. 

प्रो-कबड्डीत आत्तापर्यंत आठ संघच होते. त्या संघांत संपूर्ण दुहेरी साखळी लढत होत असे आणि त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करीत असत. आता स्पर्धेचा कालावधी वाढला आहे. त्यातील रंगत वाढवण्यासाठी स्पर्धेचे स्वरूप बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला असल्याचे भारतीय कबड्डी महासंघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आम्ही कार्यक्रम तयार करताना अनेक मुद्दे लक्षात घेत आहोत. गतवर्षीप्रमाणे सलग लीग होणार नाही, मात्र त्याच वेळी सार्वजनिक सुट्या, स्थानिक कार्यक्रम, सण लक्षात घेत आहोत. ढोबळ मानाने म्हणायचे झाले तर सोमवारी-मंगळवारी लढती नसतील; पण अन्य दिवशी लढती होतील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला कार्यक्रम तयार करताना अन्य खेळांच्या स्पर्धांचा कार्यक्रमही लक्षात घेणे भाग आहे. त्याचबरोबर अन्य लॉजिस्टिक प्रश्नही विचारात घेत आहोत, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी असेल रचना
प्रस्तावित कार्यक्रमानुसार सहभागी बारा संघांची दोन गटांत विभागणी होईल. प्रत्येक संघ अन्य संघांविरुद्ध तीनदा खेळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर अव्वल चार संघ सुपर साखळीस पात्र ठरतील आणि त्यांच्यात सुपर लीग होईल. या वेळी प्राथमिक गटातील संघ परत एकमेकांविरुद्ध खेळणार नाहीत. उदाहरणार्थ समजा, अ आणि ब गट असतील, तर अ गटातून सुपर साखळीस पात्र ठरलेले संघ केवळ ब गटातून पात्र ठरलेल्या संघाविरुद्ध खेळतील. ही एकेरी किंवा दुहेरी साखळी असेल. आता या सुपर लीगसाठी आठ संघ पात्र ठरणार की सहा, याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठवड्याच्या सुरवातीस कार्यक्रम जाहीर होईल.

Web Title: sports news pro kabaddi

टॅग्स