गुजरात जायंट्सकडून दिल्लीची सहज पकड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

हैदराबाद - प्रो-कबड्डीमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सने भक्कम बचावाच्या जोरावर दिल्लीची दबंगगिरी सहज रोखली. प्रो- कबड्डीतील महत्त्वाच्या तिसऱ्या चढाईत हुकमत राखत त्यांनी २६-२० असा सहज विजय मिळविला.

दिल्लीची मदार मेराज शेख याच्यावर होती. त्याची चारपैकी दोन चढायांत पकड करीत गुजरातने दिल्लीवरील दडपण वाढवले. त्याच वेळी फाझल अत्राचली व अबॉझर मिघानी या प्रमुख बचावपटूंना सुनील कुमारची छान साथ लाभली आणि दिल्लीच्या आक्रमणातील हवाच गेली. 

तेलगूचे अपयश कायम
घरच्या मैदानावर तेलगू टायटन्स संघाचे अपयश कायम राहिले. त्यांना सलग तिसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली. नितीन तोमर आणि रिशांक देवाडिगाच्या अनुभवाच्या जोरावर उत्तर प्रदेश योद्धा संघाने त्यांचा ३१-१८ असा पराभव केला. नितीन तोमर, देवाडिगा यांना चढाईत मिळालेले यश तसेच उत्तरार्धात बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या सुरेदर सिंगची सुपर चढाई त्यांच्या विजयात निर्णायक ठरली. 

Web Title: sports news pro kabaddi