बंगळूर बुल्सची बंगालला धडक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर - चढायांच्या आघाडीवर भक्कम कामगिरी करणाऱ्या बंगळूर बुल्स संघाने बुधवारी प्रो-कबड्डीत झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सची झुंज ३१-२५ अशी मोडून काढली. अजयकुमार, कर्णधार रोहितकुमार व आशिष कुमार या तिघांनी केलेल्या आक्रमक चढायाच निर्णायक ठरल्या. 

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या एकमात्र सामन्यात बंगळूरच्या खेळाडूंनी चढायांच्या आघाडीवर केलेली जबरदस्त कामगिरी हेच वैशिष्ट्य ठरले. तुलनेत बंगालचीदेखील मदार असणाऱ्या जांग कुन ली, मनिंदर सिंग या चढाईपटूंना आज नशिबाची साथ मिळाली नाही. बोनस आणि टच पॉइंटचे काही विरुद्ध गेलेले निर्णय त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. 

बंगळूरकडून रोहित कुमार, अजय कुमार आणि आशिषकुमार यांनी संघाच्या एकूण ३१ गुणांपैकी १९ गुण मिळविले. यातही 

अजयकुमारने सर्वाधिक आठ गुणांची नोंद केली. बंगालकडूनही जांग कुन ली याने आठ गुणांची नोंद करताना तगडा प्रतिकार केला. सुरजित आणि 

रणसिंग यांचा बचावही बंगालसाठी भक्कम ठरला. मात्र, त्यांची झुंज अपयशीच ठरली. 

विश्रांतीच्या १२-१० अशा निसटत्या आघाडीनंतर उत्तरार्धात बंगालच्या जांग कुन ली आणि मनिंदर सिंग या प्रमुख चढाईपटूंना रोखण्यात बंगळूरला यश आले  आणि तेथेच त्यांना सामना आपल्या बाजूने फिरवला.

Web Title: sports news pro kabaddi