हरियाना संघाचा गुजरातला धक्का

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

कोलकाता - गुजरात ब्लास्टर्स सचिनच्या धडाकेबाज आक्रमणासमोर हरियानाला शरणागती पत्करावी लागणार, असे वाटत असतानाच प्रशांत कुमार राय आणि अनुभवी वझीर सिंग जोशात आले आणि मध्यांतराची सात गुणांची पिछाडी भरून काढताना हरियानाने गुजरातला ४२-३६ असे हरविले.

बंगालला लखनौने रोखले
रिषांक देवाडिगा आणि हादी ताजिक हे जखमी झाल्यामुळे उत्तर प्रदेश योद्धाने प्रतिकार केला, पण मनिंदर सिंगच्या चढाया तसेच सुरजितसिंगच्या पकडींनी बंगाल वॉरियर्सचे आव्हान कायम ठेवले. कोलकाता आणि लखनौने अखेरच्या तीन चढायांत बरोबरी असतानाही गुणासाठी पूर्ण जोषाने प्रयत्न केले नाहीत, त्यामुळे ही लढत २६-२६ अशी बरोबरीत सुटली.

Web Title: sports news pro kabaddi