जयपूरने गुजरातला आणले जमिनीवर

संजय घारपुरे
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कोलकता - सरस व्यूहरचनेच्या जोरावर जयपूर पिंक पॅंथर्सने गटात आघाडीवर असलेल्या गुजरात फॉरच्युन जायटंस्‌ला ३१-२५ असे पराजित करीत गटात प्रगती केली. या विजयामुळे जयपूरने शेवटून दुसऱ्या क्रमांकावरून प्रगती केली.

जयपूरचा विजय काहीसा अतिआक्रमकपणामुळे झाकोळला गेला. जसवीर स्वत-ला रेफ्री समजतो, अशी टीका अनुपकुमारने केली होती. तोच जसवीर वाद सुरू झाल्यावर निर्णय देऊ लागल्यावर मुख्य पंच राणा रणजित सिंग यांनी त्याला प्रथम ग्रीन कार्ड दाखवले आणि त्यानंतर शांत राहण्यास बजावले. 

जयपूरचा अभ्यास पक्का होता. त्यांनी गुजरातच्या सचिनची चांगलीच कोंडी केली. तर कर्णधार सुकेश हेगडेला पहिल्या १० चढायांत दोनच गुण घेता आले. दोन लोण स्वीकारावे लागल्यावर गुजरातने हेगडेला विश्रांती दिली; पण तरीही त्यानंतर गुजरातला कधीही आव्हान देता आले नाही.

बंगाल अपराजित
अडीच मिनिटे असताना मनिंदर सिंगच्या ‘सुपर चढाई’ने बंगाल वॉरियर्सने तमीळ थलैवाजला २९-२५ असे हरवले. घरच्या मैदानावरील या विजयाने त्यांचे गटातील अग्रस्थान अधिकच भक्कम झाले. तमीळने पिछाडीनंतर जोरदार आक्रमण केले; पण मनप्रीतच्या चढाईने सामन्याचा निर्णय निश्‍चित केला.

Web Title: sports news pro kabaddi