पुण्याने पाजले दिल्लीस पाणी

संजय घारपुरे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - घरच्या कोर्टवर यू मुम्बाविरुद्ध दिल्लीने जवळपास दहा गुणांची आघाडी गमावत हार पत्करली होती, तर आज मध्यांतरास घेतलेली पाच गुणांची आघाडी गमावत पुणेरी पलटणविरुद्ध हार पत्करली. दिल्लीला सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील संघाने पाणी पाजले होते. दिल्लीने ही लढत २९-३४ अशी गमावली. 

भरवशाच्या दीपक हुडाच्या चढायांना गिरीश इरनाक आणि बदली मोनू यांच्या पकडींची मोलाची साथ लाभली. त्याच वेळी त्यांनी मेराज शेख आणि अबोलफाझी माघसोदिलोऊ या इराणच्या प्रमुख आक्रमकांना गुणांपासून रोखले. या दोघांच्या एकत्रित ३३ चढाईत दहाच गुण पुण्याने दिले, तर अनुभवी नीलेश शिंदेच्या चार पकडी विफल ठरवल्या.

पुण्याने दिल्लीवर एकतर्फी हुकूमत राखली. त्यांनी चढाईतील १९-१७ वर्चस्वास पकडीतील ११-६ वर्चस्वाची जोड दिली. पुण्याने उत्तरार्धात दोन लोण देत बाजी पूर्ण उलटवली.
तत्पूर्वी, बंगाल वॉरियर्सने बंगळूर बुल्सला ३३-२९ असे हरविले.

Web Title: sports news pro kabaddi