आशियाई स्पर्धेमुळे प्रो-कबड्डी ऑक्‍टोबरपासून

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - प्रो-कबड्डीचा पुढील दोन वर्षांचा कालावधी जाहीर करण्यात आला. यंदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आशियाई स्पर्धा होत असल्यामुळे सहाव्या मोसमाची प्रो-कबड्डी १९ ऑक्‍टोबरपासून सुरू होईल, तर २०१९ मधील स्पर्धा १९ जुलैपासून खेळविण्यात येणार आहे. १२ संघांच्या समावेशामुळे प्रो-कबड्डीचा मोसम १३ आठवड्यांचा (साधारणतः ३ महिने) झाला आहे. जुलै ते सप्टेंबर हा कालावधी आयोजक मशाल स्पोर्टस्‌ने निश्‍चित केलेला आहे.

यंदा १८ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या कालावधीत आशियाई स्पर्धा होणार असल्यामुळे प्रो-कबड्डीचा यंदाचा मोसम पुढे ढकलावा लागला. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत यंदाची स्पर्धा होईल; पण हा कालावधी देशांतर्गत स्पर्धांचा असल्यामुळे अशा स्पर्धांना आता वेगळा कालावधी शोधावा लागणार आहे. २०१९ मध्ये मात्र आशियाई स्तरावरची कोणती मोठी स्पर्धा नसल्यामुळे या वर्षी जुलै ते सप्टेंबर हा कालावधी निश्‍चित केला आहे.

Web Title: sports news pro kabaddi