‘सुपर रेड’ने गाजले दिवसाचे दोन्ही सामने

‘सुपर रेड’ने गाजले दिवसाचे दोन्ही सामने

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी
अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम राखता आली नसली, तरी महेंद्र रजपूतच्या ‘सुपर रेड’ने त्यांचे अपराजित्व कायम राहिले. त्यापूर्वी गुरुवारच्या पहिल्या सामन्यात अगदी अखेरच्या क्षणी मिराज शेखच्या सुपर रेडने दिल्लीने तमीळ थलिवाज संघावर ३०-२९ असा निसटता विजय मिळविला.

घरच्या मैदानावर गुजरात संघाला आज बंगालच्या खेळाडूंनी चांगलेच झुंजवले. पूर्वार्धात झालेल्या संथ खेळाने उत्तरार्धातील मजा चांगलीच वाढवली. आघाडीचे पारडे कुणाकडेच पूर्णपणे झुकत नव्हते. बंगालकडून जांग कुन ली आणि मनिंदर सिंग हे हुकमी एक्के चढाईत अपयशी ठरत होते. तर, गुजरातसाठी सुकेश आणि सचिन कमी अधिक प्रमाणात संघासाठी गुण मिळवत होते. गुजरातसाठी राखीव म्हणून उतरलेल्या महेंद्र राजपूतकडे बंगाल आणि बंगालच्या दीपक नरवालकडे गुजरातने दुर्लक्ष केले. या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीने सामन्यातील उत्तरार्धातील रंगत वाढली. या दरम्यान बंगालने गुजरातवर लोण देत आघाडी मिळवली होती. या वेळी मात्र गुणांचा फरक पाचवर पोचला. त्या वेळी बोनस गुण आणि थर्ड रेडच्या आधारावर पुन्हा खेळात सावधपणा आला. त्याच वेळी महेंद्रच्या सुपर रेडने बंगालवर लोण बसला आणि त्यांच्याकडे एका गुणाची आघाडी आली.

अखेरच्या एका मिनिटातील तीन चढाया निर्णायक ठरणार होत्या. त्या वेळी बंगालच्या बचावफळीने संयम दाखवला आणि दीपकने आपल्या निर्णायक चढाईत एकदा बोनस गुणासह दोन आणि अखेरच्या चढाईत एक गुण मिळवून सामना २६-२६ बरोबरीत सोडवला. दीपकने चढाईत सात गुणांची कमाई केली. दोन्ही संघांकडून बचावात फारसी चमक दाखवण्यात खेळाडूंना आलेले अपयशच या बरोबरीचे कारण ठरले.

त्यापूर्वी, आज झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार अजय ठाकूरच्या एकांगी खेळाचा फायदा तमिळ संघाला उठवता आला नाही. त्याने यंदाच्या मोसमात प्रथमच लौकिकाला साजेशा चढाया करताना १३ गुणांची कमाई केली. मात्र, त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली नाही. अमित हुडाने पकडीचे चार गुण मिळवले. पण, मोक्‍याच्या क्षणी त्याच्या हातून एकदा मिराज निसटला आणि दुसऱ्या वेळी त्याच्या सुपर रेडने सामन्याचे चित्र पालटवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com