यू मुम्बाची विजयी सांगता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत जयपूरला हरविले

मुंबई - यू मुम्बाने आक्रमकांनी वर्चस्व राखलेल्या लढतीत जयपूर पिंक पॅंथर्सचा ३६-३२ असा पाडाव करीत अखेर घरच्या मैदानावरील टप्प्याची यशस्वी सांगता केली. अखेरच्या मिनिटात व्यूहरचनेत सरस ठरत मुंबईने बाजी मारली. यामुळे मुंबईने बाद फेरीच्या आशाही कायम ठेवल्या.

तब्बल वीस मिनिटे पिछाडी, स्वीकारलेला लोण हे सगळे मागे सारताना उत्तरार्धातील सहाव्या मिनिटास आघाडी घेतली. विश्रांतीपूर्वी मुंबईला लोण स्वीकारावा लागला होता. पण मध्यांतरापूर्वी काही वेळ जसवीरची पकड करीत मुंबईने प्रतिकाराचे संकेत दिले होते. सुरिंदरने जसवीरच्या दोनदा पकडी करीत लोण परतवण्यात मोलाची कामगिरी बजावली.  

या सामन्यातील पकडीचा पहिला गुण नोंदवण्यास पंधरा मिनिटे लागली. काशिलिंग आडकेची पकड करीत जयपूरने लोण दिला, पण त्यानंतर जणू मुंबईला प्रतिआक्रमणाची प्रेरणा दिली.  

सचिनच्या उपस्थितीतही हार
तमिळ थलैवाज संघ सहमालक सचिन तेंडुलकरच्या मुंबईत दुसऱ्या लढतीत हरला. पाटणाविरुद्धच्या एकतर्फी पराभवानंतर ते तेलुगू टायटन्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत पराजित झाले. पकडीत सुपर टेन क्वचितच घडते. हे सोमबीरने केले. त्याने तीन सुपर टॅकल करीत संघाच्या पकडीच्या सोळापैकी दहा गुण मिळवले. त्यामुळे तेलुगू टायटन्सने ३३-२८ असा विजय संपादला.

Web Title: sports news pro-kabaddi competition