पकडींच्या खेळात पुणे फसले

संजय घारपुरे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

बंगळुरू बुल्सचा सहा पराभवांनंतर विजय
सोनिपत - पराभवाच्या खाईत सापडलेल्या बंगळुरु बुल्सने विजयांची पकड केली, ती पकडींच्या खेळात. मिनिटास जेमतेम सरासरी एक गुण अशा बचावात्मक खेळात पुण्याची सुरवातीची पकड निसटली आणि बंगळुरुने २४-२० या विजयासह एका महिन्याचा विजयाचा दुष्काळ संपवला; तसेच सलग सहा पराभवांनंतरचा पहिला विजयही मिळविला.

बंगळुरू बुल्सचा सहा पराभवांनंतर विजय
सोनिपत - पराभवाच्या खाईत सापडलेल्या बंगळुरु बुल्सने विजयांची पकड केली, ती पकडींच्या खेळात. मिनिटास जेमतेम सरासरी एक गुण अशा बचावात्मक खेळात पुण्याची सुरवातीची पकड निसटली आणि बंगळुरुने २४-२० या विजयासह एका महिन्याचा विजयाचा दुष्काळ संपवला; तसेच सलग सहा पराभवांनंतरचा पहिला विजयही मिळविला.

प्रतिस्पर्धी संघात नावाजलेले आक्रमक खेडाळू आहेत, तरीही पूर्वार्धात सात डू ऑर डाय चढाया झाल्या. पूर्वार्धातील १८ पैकी १४ गुण पकडीचे होते. त्यात पुण्याने ८-६ वर्चस्व राखले. त्यामुळे त्यांच्याकडे विश्रांतीस दोन गुणांची आघाडी होती. उत्तरार्धातही पकडींवरच भर असल्याचे चित्र कायम राहिले; पण बंगळुरुने पकडीचे अतिरिक्त नऊ गुण मिळविताना तीनच गमावले. त्यामुळेच त्यांची सरशी झाली. बंगळुरुला एका लोणचाही फायदा झाला. पुण्याने चढाई तसेच बोनसमध्ये एका गुणाचे वर्चस्व राखले; पण ते पुरेसे नव्हते.

दोन सामन्यांत पुनरागमन करणारा रविंदर पहल हा पकडीतील ताकदवान खेळाडू, तो जास्त जोशात असणार. त्याच्या बाजूने जास्त धोका पत्करायचा नाही; पण दुसऱ्या बाजूने बोनस गुण घ्यायचे आणि तिसऱ्या रेडला आक्रमण करण्याची पुण्याची योजनाच विफल ठरली.

लोण स्वीकारला, त्या वेळीही चार गुणांनीच मागे होतो, तेव्हा बोनसवर भर देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे खेळले असते, बोनस गुण मिळवले असते, तर पिछाडी भरून काढली असती. बंगळुरुच्या बचावावर दबाव आला असता; पण आमचे आक्रमक गुणासाठी प्रयत्न करत होते, त्यात बाद होत गेले आणि हार पत्करावी लागली, असे पुण्याचे मार्गदर्शक बी. सी. रमेश यांनी सांगितले.
या सामन्यात पूर्वार्धात सात, तर सामन्यात एकंदर चौदा डू ऑर डाय रेड झाल्या. त्याची सांगताही याच रेडने झाली. रोहित कुमार त्याच्या नवव्या चढाईत तसेच उत्तरार्धातील पाचव्या डू ऑर डाय रेडमध्ये त्याची पकड करण्याचा प्रयत्न विफल ठरवला आणि दोन गुण मिळवले.

मध्यांतरानंतरच्या आठव्या मिनिटास झालेल्या या झटापटीत सामन्यात प्रथमच आक्रमक एकापेक्षा जास्त गुण मिळवण्यात सरस ठरला होता. 

Web Title: sports news pro kabaddi competition