विजयाची सोपी संधी हरियानाने दवडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सोनिपत - विश्रांतीस आठ गुणांची आघाडी, पाच मिनिटे असताना सहा गुणांचे वर्चस्व या परिस्थितीतही हरियाना स्टीलर्सने घरच्या मैदानावर जयपूर पिंक पॅंथर्सला लढत बरोबरीत सोडवण्याची संधी दिली. 

सोनिपत - विश्रांतीस आठ गुणांची आघाडी, पाच मिनिटे असताना सहा गुणांचे वर्चस्व या परिस्थितीतही हरियाना स्टीलर्सने घरच्या मैदानावर जयपूर पिंक पॅंथर्सला लढत बरोबरीत सोडवण्याची संधी दिली. 

या लढतीत हार टाळल्यामुळे हरियाना गटात आघाडीवर गेले असले, तरी त्यांना विजय दवडल्याचे दुःख हे असणारच.  अखेरच्या टप्प्यात नितीन रावलने पाच चढाईत चार गुण घेत प्रतिकारात मोलाची भूमिका बजावली. त्याचबरोबर सुरवातीस जयपूरला पकडीचे गुणही हरियाणाने रोखले होते; पण नेमके हेच गुण देत हरियानाने आपली बाजू कमकुवत केली. पाच मिनिटे असताना पाच गुणांनी आघाडीवर असलेले हरियाना तीन मिनिटात २६-२७ असे मागे पडले. याच वेळी सुरजितने चढाईत गुण घेत हरियाणाला बरोबरी साधून दिली आणि यजमानांना घरच्या मैदानावरील अखेरच्या लढतीतील हार टाळता आली.  

यजमानांच्या दीपक दहिया, सुरजित सिंगला सुपर टेन करता आले नाहीत. वझीर सिंग एकच गुण नोंदवू शकला, तर प्रशांत कुमार रायला वगळण्यात आले. नितीन रावलने चढाईत नोंदवलेले ११ गुण जयपूरसाठी मोलाचे ठरले; पण जयपूर गटात शेवटून दुसरेच आहेत.

Web Title: sports news pro-kabaddi competition