प्रो-कबड्डीत सौरव गांगुलीही सह संघमालक?

पीटीआय
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई / कोलकाता - भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली हा सचिन तेंडुलकरप्रमाणेच प्रो-कबड्डी संघाचा सहमालक होण्याची शक्‍यता आहे. त्याने कोलकाता वॉरियर्स संघाची सहमालकी मिळवण्यासाठी चर्चा सुरू केली असल्याचे समजते.

गांगुली ॲटलेटिको डे कोलकाता या इंडियन सुपर लीगमधील संघाचा सहमालक आहे. प्रो-कबड्डीतील कोलकाता संघाची मालकी किशोर बियानी यांच्या फ्युचर ग्रुपकडे आहे. त्यांच्याबरोबर सौरव गांगुलीने चर्चा सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रो-कबड्डी वेगाने लोकप्रिय होत आहे. त्यामुळे अनेक प्रथितयश कंपन्या या लीगशी नाते जोडत आहेत. 

गांगुली आणि सध्याचे फ्रॅंचाईज प्रमुख याबाबतची घोषणा काही दिवसांत करू शकतात, असे सांगितले जात आहे. मात्र दोघांनी याबाबत मौनच बाळगले आहे. प्रो-कबड्डीतील कोलकात्याचा या वेळचा संघ ताकदवान आहे. 

Web Title: sports news Pro. Kabaddi Sourav Ganguly co-coordinator