पुण्याच्या सचिन सोलंकीने नोंदविला विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे - पुण्यातील सचिन सोलंकी याने कराटे मार्शल आर्टमध्ये मेडीसन बॉलवर बॅलेन्स करून 54 सेकंदात 128 किक मारत विश्‍वविक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तान खेळाडूच्या नावावर होता. अहमद बोदला याने 44 किकचा विक्रम नोंदविला होता. यापूर्वीही सचिनने साईड किक पोझिसन आणि फ्रंट किंक पोझिसन या प्रकारांमध्ये विश्‍वविक्रमी कामगिरी केली आहे.

सचिन सोलंकी याने हा विक्रम नोंदविण्यासाठी कठीण परिश्रम घेतले आहेत. हा विक्रम करण्यासाठी सचिन दररोज दोन तास कसून सराव केला. यापूर्वीही सचिनने अमेरिकेचे रेकॉर्ड सेटल, इंडीयाझ वर्ल्ड रेकॉर्ड, मेगास्टार वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा किताब पटकाविलेला आहे. ही यशस्वी कामगिरी करण्यासाठी त्याला युनिव्हर्सल सोटोकॉन कराटे असोसिएशनचे चीफ इंस्ट्रक्‍टर संजय पवार, राजेश सोलंकी, गिरीश ललवाणी यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे आई-वडील, भाऊ व पत्नीसह मित्र परिवारांचे सहकार्य मिळाले.

Web Title: sports news pune sachin solanki karate martial art