आशियाई कुस्तीत राजेंदरच्या ब्राँझने भारताच्या पदक मोहिमेस सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई - आंतरराष्ट्रीय ग्रीको रोमन कुस्तीत भारताचे पदकाचे आशास्थान असलेल्या राजेंदर कुमारनेच आशियाई कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या पदकाचे खाते उघडले. त्याने रेपीचेजद्वारे ब्राँझ पदक जिंकले. नवीन आणि विक्रम कुरादे यांना ब्राँझपदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली.

कोझोमकुल स्पोर्टस पॅलेसमधील या स्पर्धेत राजेंदर ५५ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तानोकुरा शोता याच्याविरुद्ध २-५ असा पराजित झाला, पण शोताने अंतिम फेरी गाठल्यामुळे राजेंदरला रेपीचेजद्वारे ब्राँझ जिंकण्याची संधी मिळाली, त्याचा फायदा दिल्ली राष्ट्रकुल विजेत्या राजेंदरने घेतला. नवीनला १३० किलो गटाच्या ब्राँझपदकाच्या लढतीत चीनच्या झाओमी निए याच्याविरुद्ध १-३ अशी हार पत्करावी लागली. त्याने रेपीचेजच्या पहिल्या फेरीत जपानच्या अराता सोनोदा याला १०-० असे सहज हरवून आशा उंचावल्या होत्या. विक्रम कुरादे ब्राँझपदकाच्या लढतीत मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. तो रेपीचेज लढतीत कझाकस्तानच्या एइननागुलॉव मिराम्बेक याच्याविरुद्ध ०-९ असा पराजित झाला. गुरप्रीत सिंगला ७७ किलो आणि सुनील कुमार ८७ किलो गटात पराभव पत्‍करावा लागला.

Web Title: sports news rajender kumar wrestling competition