रिषभचे ३२ चेंडूंत शतक

रिषभचे ३२ चेंडूंत शतक

नवी दिल्ली - रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर कर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने उत्तर विभागीय सईद मुश्‍ताक अली टी-२० स्पर्धेत रविवारी घणाघाती शतकी खेळी करून आपले नाणे खणखणीत वाजवले.

हिमाचल प्रदेशाच्या १४४ धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ११.४ षटकांतच एकही विकेट न गमावता विजयी लक्ष्य गाठले. यात ३८ चेंडूंत बिनबाद ११६ धावांची खेळी करणाऱ्या रिषभने केवळ ३२ चेंडूंतच शतक पूर्ण केले. 

रिषभने आपल्या विक्रमी खेळीत आठ चौकार आणि १२ षटकार ठोकले. रिषभची या सामन्यातील कामगिरी अष्टपैलू ठरली. त्याने यष्टिरक्षण करताना चार झेलही घेतले. रिषभला गौतम गंभीरची साथ मिळाली. त्याने ३३ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या.

गेल्याच महिन्यात रोहित शर्माने श्रीलंकेविरूद्ध ३५ चेंडूत शतक साजरे केले होते. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून तेव्हा रोहितच वेगवान शतकवीर होता. रिषभने आजच्या खेळीने रोहितलाही मागे टाकले. टी-२० मध्ये सर्वाधिक वेगवान तीस चेंडूतील शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

संक्षिप्त धावफलक - हिमाचल प्रदेश २० षटकांत ८ बाद १४४ (निखिल गुप्ता ४०, प्रशांत चोप्रा ३०, प्रदीप सांगवान २-३९) पराभूत वि. दिल्ली नाबाद १४८ (रिषभ पंत नाबाद ११६- ३८ चेंडू, ८ चौकार, १२ षटकार, गंभीर नाबाद ३०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com