टीम कोहलीचा गौरव करताना शास्त्रींचा गांगुलीवर निशाणा?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कोलंबो - मैदानाबाहेर रंगलेल्या नाट्यानंतर रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली आणि श्रीलंकेत दुबळ्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर रवी शास्त्री यांचाही आत्मविश्‍वास वाढला आहे. विराट कोहलीचा हा संघ अगोदरच्या ग्रेट खेळाडूंपेक्षा अधिक चांगले यश मिळवत आहे, असे विधान केले. विराट कोहलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून माजी कर्णधार सौरभ गांगुलीवर निशाना साधण्याचा शास्त्री यांचा हेतू आहे का? अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात करण्यात येत आहे.

अगोदरचे काही माजी दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या संघाने संपूर्ण कारकिर्दीत जेवढे यश मिळवले नाही तेवढे यश या संघाने आत्ताच मिळवले आहे. २०१५ मध्ये श्रीलंकेतच मिळवलेल्या मालिका विजयाचा संदर्भ शास्त्री यांनी दिला. 

दोन वर्षांपूर्वी शास्त्री टीम इंडियाचे संघ संचालक होते, त्या वेळी कोहलीच्या संघाने २२ वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्या अगोदर १९९३ मध्ये महंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेत मालिका जिंकली होती. गेल्या २० वर्षांत भारतीय क्रिकेटमधील दिग्गज श्रीलंकेत अनेकदा खेळले आहेत; पण त्यांना मालिका जिंकला आलेली नव्हती; पण या संघाने यश मिळवले आहे, असे रवी शास्त्रींनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: sports news ravi shastri cricket india team saurav ganguly