रोनाल्डोची सुवर्ण हॅट्‌ट्रिक

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

माद्रिद - लिओनेल मेस्सीने चॅंपियन्स लीगमधील गोलांचे शतक पूर्ण केल्यानंतर काही दिवसांतच ख्रिस्तियानो रोनाल्डोने फुटबॉल कारकिर्दीतील पन्नासावी हॅट्‌ट्रिक केली. 

माद्रिद - लिओनेल मेस्सीने चॅंपियन्स लीगमधील गोलांचे शतक पूर्ण केल्यानंतर काही दिवसांतच ख्रिस्तियानो रोनाल्डोने फुटबॉल कारकिर्दीतील पन्नासावी हॅट्‌ट्रिक केली. 

जगातील अनेक फुटबॉलपटू एखादी हॅट्‌ट्रिक केली तरी खूश होतात. सुपरस्टार रोनाल्डोने तर याचा धडाकाच लावला आहे. त्याने ला लिगामध्ये (स्पॅनिश लीग) चार गोल करत रेयाल माद्रिदला गिरोनाविरुद्ध ६-३ असा विजय मिळवून दिला. त्याची रेयाल माद्रिदकडून खेळतानाची ही ४४ वी हॅट्‌ट्रिक, तर व्यावसायिक फुटबॉल लढतीतील ४५ वी. यापैकी एक हॅट्‌ट्रिक, तर त्याने मॅंचेस्टर युनायटेडकडून खेळताना केली आहे. याशिवाय त्याने पोर्तुगालकडून खेळताना पाचदा हॅट्‌ट्रिक केली आहे. 

हॅट्‌ट्रिकवीर
 रोनाल्डोने एका सामन्यात तीन गोल ४१ वेळा केले आहेत.
 त्याने एका सामन्यात चार गोल सात वेळा, तर पाच गोल दोनदा केले 
 पहिल्या हॅट्‌ट्रिकनंतर १० वर्षे २ महिन्यांत पन्नासावी हॅट्‌ट्रिक
 रोनाल्डोची ला लीगामधील सर्वाधिक ३४ वी हॅट्‌ट्रिक
 त्याने चॅंपियन्स लीगमध्ये सात, कोपा डे रे मध्ये दोनदा आणि विश्वकरंडक क्‍लब स्पर्धेत एकदा हॅट्‌ट्रिक केली आहे
 पोर्तुगालकडून खेळताना चार हॅट्‌ट्रिक विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत, तर एक युरोपिय पात्रता स्पर्धेत 
 सर्वाधिक नऊ हॅट्‌ट्रिक २०१४-१५ च्या मोसमात 
 सेविलाविरुद्ध पाच हॅट्‌ट्रिक, कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांत सर्वाधिक 
 ॲटलेटिकोविरुद्ध तीनदा हॅट्‌ट्रिक; पण बार्सिलोनाविरुद्ध एकही नाही

Web Title: sports news Ronaldo gold hat-trick