साईनाच्या ‘ब्लॅकमेल’नंतर वडिलांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट/नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वडिलांना पदाधिकारी नेण्यासाठीचा खर्च केल्यानंतरही त्यांना अधिस्वीकृती कार्ड न मिळाल्याने साईना नेहवाल चिडली होती. तिने न खेळण्याची धमकी दिली. अखेर तिच्या वडिलांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात आल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने सांगितले.

गोल्ड कोस्ट/नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वडिलांना पदाधिकारी नेण्यासाठीचा खर्च केल्यानंतरही त्यांना अधिस्वीकृती कार्ड न मिळाल्याने साईना नेहवाल चिडली होती. तिने न खेळण्याची धमकी दिली. अखेर तिच्या वडिलांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात आल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने सांगितले.

खेळाडूंनी नातेवाईकांना स्पर्धेसाठी नेण्यावरून वाद सुरू होता. आपल्या वडिलांचा खर्च केल्यानंतरही त्यांना ‘अतिरिक्त अधिकारी’ असे संबोधल्याबद्दल साईना चिडली. त्यांना राष्ट्रकुल क्रीडा नगरीत तसेच स्टेडियमवर खेळाडूंच्या नजीक प्रवेश मिळणार नसल्याचेही तिने सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेच्यावेळी वडील सोबत असणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असे साईनाने सांगितले होते.
अतिरिक्त अधिकाऱ्यांना क्रीडानगरीत मुक्काम करता येत नाही, असे प्रतिट्‌विट भारतीय ऑलिंपिक संघटनेने केले; पण त्याचवेळी मेल टुडे या दिल्लीतील दैनिकाने साईनाने भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांना पाठवलेल्या ई-मेलच प्रसिद्ध केला आहे. त्यात वडिलांना अधिस्वीकृती कार्ड दिले नाही तर आपण स्पर्धेत खेळणार नाही, असे साईनाने म्हटले आहे. सोमवारी अधिस्वीकृती नाकारलेल्या भारतीय ऑलिंपिक संघटनेने मंगळवारी साईनाच्या वडिलांना हे कार्ड दिले असल्याचे ट्‌विट केले. त्यासोबत साईनाच्या वडिलांचे कार्डसह असलेले छायाचित्रही दिले आहे. साईनाचे वडील, सिंधूची आई यांसह पंधरा जणांचा खर्च करण्यास केंद्रीय क्रीडा खात्याने नकार दिला आहे.

राष्ट्रकुलमध्ये...
    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट करण्याच्या भारतीय बॅडमिंटनपटूंच्या मोहिमेस नव्या सर्व्हिस नियमाची अंमलबजावणी होणार नसल्याने जास्तच ताकद मिळाली आहे. 
    भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांना राष्ट्रकुल स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले आहे. साईना नेहवालला दुसरे तर, जी. ऋत्विकाला आठवे मानांकन मिळाले आहे. पुरुष एकेरीत श्रीकांतनंतर भारताच्या एच. एस. प्रणॉयला तिसरे मानांकन आहे.
    एक लढत जिंकल्यानंतर मेरी कोमचे राष्ट्रकुल पदार्पणातील पदक निश्‍चित. बॉक्‍सिंगमध्ये ४८ किलो वजनी गटात थेट उपांत्यपूर्व फेरीत. विकास (७५ किलो), मनिष (६०किलो) दोघांना पहिल्या फेरीत ‘बाय’.
    ऑस्ट्रेलियाची डायव्हिंग खेळाडू तानेका कोवचेन्कोची स्पर्धेच्या पूर्वसंध्येलाच निवृत्तीची घोषणा. एक जरी चुकीची डाईव्ह मारल्यास पॅरालिसीसला धोका असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यामुळे घेतला निर्णय.

Web Title: sports news saina nehwal father entry common wealth agmes