गिअर बिघडूनही जिगरबाज संजय टकलेकडून रॅली पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

पुणे - पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याच्यासाठी नव्या मोसमाची सुरवात यशाच्या निकषावर लक्षवेधी झाली, तसेच संघभावनेच्या दृष्टीने त्याने खूप काही कमावले. थायलंडमधील राष्ट्रीय रॅली मालिकेच्या पूर्वतारीसाठी होणाऱ्या प्री-रॅली मालिकेतील अखेरच्या फेरीत हायड्रॉलिक क्‍लच पंप बिघडल्यानंतरही तीन स्टेज एकाच गिअरमध्ये चालवीत त्याने रॅली पूर्ण केली. याबरोबच तो एकूण क्रमवारीत तिसरा, तर थायलंडचा नॅव्हिगेटर थान्याफात मिनील एकिूण क्रमवारीत पहिला आला.

रविवारी थायलंडमधील चांताबुरी प्रातंमधील पाँग नाम रॉन येथे ही रॅली झाली. गेल्या मोसमातील अखेरची चौथी फेरी यंदा झाली. त्यात सहाव्या स्टेजला संजयच्या इसुझी डीमॅक्‍स युटिलिटी कारचा क्‍लच पंप बिघडला. त्यामुळे त्यांना ३८ किलोमीटर अंतर दुसऱ्या गिअरमध्येच कार चालवावी लागली. त्यामुळे त्यांची दीड मिनिटे वाया गेली. ती स्टेज पूर्ण केल्यानंतर सर्व्हिसिंगमध्ये बिघाड दुरुस्त करून त्यांनी सातवी स्टेज सुरू केली. त्यात त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची वेळ नोंदविली. आठव्या स्टेजला आत्मविश्वासाने सुरवात केल्यानंतर इंजिन माउंट एका बाजूला कलल्यामुळे हायड्रॉलिक क्‍लच पंप तुटला. ही स्टेज त्यांना तिसऱ्या गिअरमध्ये चालवावी लागली. नववी स्टेजही त्यांना अशाच प्रकारे चालवावी लागली. त्यात स्टेजपूर्वी त्यांना कार पुश स्टार्ट म्हणजे ढकलून सुरू करावी लागली.

संजयने फॉरेन ओपन फोर बाय फोर गटात सातवे स्थान मिळविले. मालिकेतील तीन फेऱ्या पूर्ण केल्यामुळे संजयला एकूण क्रमवारीसाठी पात्र ठरला आले. त्याच्यापेक्षा पुढे असलेल्या इतर स्पर्धकांनी दोनच फेऱ्या केल्या होत्या. 

संजय म्हणाला की, विचाई वात्ताहाविशुथ यांचा संघ माझ्यासाठी बरीच मेहनत घेतो. त्यामुळे मिनीलसाठी रॅली पूर्ण करणे आवश्‍यक होते. मोसमाची सुरवात समाधानकारक झाली आहे. मागील वर्षी दोन फेऱ्या मला तांत्रिक बिघाडामुळे पूर्ण करता आल्या नव्हत्या.

Web Title: sports news Sanjay Takle

टॅग्स