संजीवनी, रणजितची जेतेपदाची हॅट्‌ट्रिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

बेळगाव - लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीमधील अव्वल धावपटू रणजित कुमार आणि संजीवनी जाधव यांनी आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्‌ट्रिक साधली. येथे सोमवारी झालेल्या शर्यतीत संजीवनीने १० कि.मी. अंतर ३७.२९ मिनिटे, तर रणजितने ३३.१४ मिनिटे अशी वेळ देऊन विजेतेपद मिळविले. विशेष म्हणजे त्याने पुणे विद्यापीठाच्या अनुभवी किसन तडवी याला मागे टाकले. किसन दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

रणजित मूळचा उत्तर प्रदेशचा असला, तरी तो यापूर्वी मंगळूर विद्यापीठाचे नेतृत्व करत होता. या वेळी त्याने पंजाब विद्यापीठाचे नेतृत्व केले. रणजित नाशिक येथे विजेंद्र सिंग यांच्याकडे मार्गदर्शन घेतो. विशेष म्हणजे संजीवनीदेखील त्यांचीच शिष्या आहे. 

 निकाल - महिला : संजीवनी जाधव (३७.२९, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे), वर्षादेवी (कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाना), डिंपल सिंग (दीनदयाळ विद्यापीठ, गोरखपूर), चित्रा पी. यू. (कालिकत विद्यापीठ), आरती पाटील (मंगळूर विद्यापीठ), पूलन पॉल (दीनदयाळ विद्यापीठ, गोरखपूर), पुरुष : रणजितकुमार (३३.१४, पंजाब विद्यापीठ, चंडीगड), किसन तडवी (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे), रंजितकुमार पाटील (मंगळूर विद्यापीठ, मंगळूर), विष्णूवीर सिंग (पंजाब विद्यापीठ, पटियाला), कांतिलाल कुंभार (मंगळूर विद्यापीठ).

Web Title: sports news Sanjivani Jadhav Inter-University Cross Country Championship